लोणार (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील वडगाव तेजन येथील सरस्वती विद्यालय व अंगणवाडी केंद्र येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्र सुलतानपूर अंतर्गत उपकेंद्र वडगाव तेजन येथे नुकतेच अंगणवाडी व शाळा या ठिकाणी जंतनाशक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये सर्व १ ते १९ वर्षाच्या विद्यार्थ्यांना गोळ्यावाटप करण्यात आल्या. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.सागर बाजड यांनी सांगितले की, जंतनाशक गोळीमुळे कुपोषणासारखे आजार आपण टाळू शकतो. या जंतनाशक गोळीमुळे बालकांचे वजन, उंची चांगल्याप्रकारे राहते, तसेच बालक सुदृढ बनू शकते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला गोळी देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना गोळी घ्यायची राहिली आहे त्यांच्यासाठी २० फेब्रुवारीरोजी परत एकदा गोळ्याची वाटप करण्यात येणार आहे. ही मोहीम अंतर्गत सरस्वती विद्यालय वडगाव तेजन येथे सरपंच डॉक्टर विजय तेजनकर यांच्याहस्ते गोळ्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांच्यासह आरोग्यसेवक फडके, आरोग्य निरीक्षक श्री गुंजकर, श्रीमती गायकवाड आरोग्य सेविका तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
—-