पणजी (प्रतिनिधी) – राष्ट्रीय जलतरण स्पर्धा गोवा राज्यात 12 ते 13 फेब्रुवारीदरम्यान पार पडल्यात. या स्पर्धांत बुलढाणा जिल्ह्याने नेत्रदीपक कामगिरी करत विविध पदकांची जोरदार कमाई केली. त्यामुळे राज्याचा चांगलाच दबदबा या स्पर्धांत पहायला मिळाला.
या राष्ट्रीय स्पर्धांत विष्णुभगवान गाढे ( सहाय्यक लेखाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा) यांनी IM 200 मीटर सिल्व्हर मेडल, 100 मीटर Bak st, 400 मीटर Free stile ब्राॅन्स मेडल प्राप्त केले. तर विठ्ठलराव चव्हाण (माजी जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक संघटना) 400 मीटर Free stile बाॅन्श मेडल, 50 मीटर Bres stile सिल्व्हर मेडल मिळवले. डाॅ. मंगेश पाटील 50 Bak stile Gold medal प्राप्त केले. भुजंगराव आप्पा कापसे (कापसे दुकानदार) यांनी 50 मीटर Bres stok Gold medal, 100 मीटर Back stok Gold medal, 50 मीटर Free stile बाॅन्श मेडल प्राप्त करून जिल्ह्याचे नाव उंचावले तर बाबुराव खारडे काका (सेवानिवृत्त वाहन चालक PWD) यांनी 400 मीटर Free Stile Gold medal, 50 मीटर Free stile सिल्व्हर मेडल प्राप्त केले. या जलतरणपटूंच्या विजयाने बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला होता. या सर्व स्पर्धकांना गोवा येथे महाराष्ट्राच्या वतीने मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत भारतभरातून जलतरणपटू सहभागी झाले होते.