– जिल्ह्यातील पाच तहसीलदारांच्या बदल्या
चिखली (महेंद्र हिवाळे) – कर्तव्य कठोरता, सर्वसामान्य नागरिकांप्रती सजगता आणि मनमिळावू स्वाभाव, तसेच चिखली तहसील कार्यालयाचे रुपडे पालटून हे शासकीय कार्यालय आनंददायी व लोकाभिमुख करणारे लोकप्रिय तहसीलदार सुरेश कव्हळे यांची राज्य सरकारने आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अकोला येथे बदली केली आहे. त्यांच्या जागेवर अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील संतोष काकडे हे नवे तहसीलदार येणार आहेत. जिल्ह्यातील पाच तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, त्यापैकी सुरेश कव्हळे यांच्या बदलीने चिखली तालुकावासीय गहिवरले आहेत. अमरावती येथून चिखली येथे येणारे संतोष काकड़े यांनी याअगोदर मेहकरलासुध्दा तहसीलदार म्हणून काम पाहिले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील २१ तहसीलदारांच्या राज्य सरकारने बदल्या केल्या आहेत. त्यात जिल्ह्यातील पाच तहसीलदारांचा समावेश आहे. चिखलीचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांची अकोला, बुलढाण्याचे तहसीलदार रूपेश खंदारे यांची दारव्हा (जि.यवतमाळ), मलकापूरचे तहसीलदार आर.यू.सुरडकर यांची उमरेड (जि.यवतमाळ), शेगावचे तहसीलदार समाधान सोनवणे यांची तेल्हारा (जि.अकोला) संग्रामपूरचे तहसीलदार योगेश्वर टोपे यांची वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली आहे. या बदल्यानंतर चिखली येथे संतोष काकडे, मलकापूर येथे आर.एम.तायडे, शेगाव येथे डी. आर. बाजड, संग्रामपूर येथे पी.झेड.भोसले हे नवे तहसीलदार आले आहेत.
——
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ टीमच्यावतीने चिखली तहसीलदार सुरेश कव्हळे यांचा सत्कार!