BULDHANAChikhaliVidharbha

‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ टीमच्यावतीने चिखली तहसीलदार सुरेश कव्हळे यांचा सत्कार!

चिखली ग्रामीण (सुनील मोरे) – गेल्या तीन वर्षांपासून चिखली तहसीलदार पदावर कार्यरत असलेले डॉ. अजितकुमार येळे यांची प्रशासकीय बदली करण्यात आली, आणि लगेच नव्याने तहसीलदारपदी विराजमान झालेले सुरेश कव्हळे यांनी तहसीलदारपदाचा पदभार हाती घेताच, त्यांचा सत्कार ब्रेकिंग महाराष्ट्र परिवाराच्यावतीने तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्यावतीने नुकताच तहसील कार्यालयात करण्यात आला. याप्रसंगी गतिमान व लोकाभिमुख प्रशासन देऊन राज्य सरकारच्या योजनांचा सर्वसामान्यांना लाभ देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू, अशी ग्वाही नूतन तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ टीमला दिली.

बुलडाणा जिल्ह्यात १३० गावांचा समावेश असून, चिखली तालुक्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, शेतकरी संघटना, आरपीआय, बहुजन समाज पार्टी, प्रकाश आंबेडकर गट आदी पक्षाच्या नेत्यांनी तालुक्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे अगोदरच प्रशासनात चांगला काम करणारा अधिकारी शोधून त्यांच्याकडे चिखली तहसीलचा कारभार सोपविला जातो. या कार्यालयात तहसीलदार यांच्यासह पाच नायब तहसीलदार काम पाहतात. या अगोदरही प्रा.खडसे, बगळे, गायकवाड, आणि नुकतेच प्रशासकीय बदलीवर गेलेले आहेत आणि आता गेल्या तीन वर्षांपासून चांगल्या प्रकारे काम करणारे डॉ. अजितकुमार येळे यांनी यशस्वीरित्या कामकाज पाहिलेले आहे. यापुढेही तहसीलचा कारभार व्यवस्थित पार पाडण्यासाठी राळेगाव, लोणार आणि पांढरकवडा या तालुक्यांत शेतकर्‍यांचे, कर्मचार्‍यांचे प्रश्न, गोरगरीब जनतेच्या समस्या शासनाकडे पाठपुरावा करून ते प्रश्न मार्गी लावणारे तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्याकडे चिखली तहसीलदार या पदाचा पदभार आलेला आहे. तहसीलदार कव्हळे यांनी पदभार हाती घेताच सर्व कोतवाल कर्मचार्‍यांना बोलावून कार्यालयाची साफसफाई केली. तसेच पावसामुळे नुकसान झालेल्या फळबागांची शेतात जावून पाहणी केली. यापुढे तालुक्यातील विकासाच्या प्रश्नांकरिता तहसील कार्यालय तत्परतेने कार्यरत राहील, असेही त्यांनी सांगितले.

अशा या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याचा सत्कार ब्रेकिंग महाराष्ट्र परिवाराच्यावतीने जिल्हा विशेष प्रतिनिधी संजय निकाळजे, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा दै. देशोन्नतीने वरिष्ठ पत्रकार प्रतापराव मोरे, पत्रकार उध्दव थुट्टे पाटील यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून केला. याप्रसंगी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना तहसीलदार कव्हळे म्हणाले, की लोकाभिमुख प्रशासन तसेच गतिमान प्रशासन ही काळाची गरज आहे. शासनाच्या योजना व सेवा लोकांना सहज सुलभ उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. तसेच, महसूल प्रशासनाचे कामकाज अधिक लोकाभिमुख कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करत आहोत. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकर्‍यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरू आहेत, असेही ते म्हणाले.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!