– स्थानिक ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत?
अहमदनगर (प्रतिनिधी) – नागापूर-बोल्हेगाव येथील प्रभाग क्रमांक सातमधील गणेश चौक ते केशव कॉर्नरपर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाले असून, या रस्त्यावरील पाईपलाईन तसेच वीजखांब स्थलांतरित करण्यात यावेत, व नंतरच काम करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून पुढे आली होती. त्यामुळे या कामाची पाहणी महापौर रोहिणीताई शेंडगे, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, संजय शेंडगे, या प्रभागाचे नगरसेवक तथा सभागृहनेते अशोक बडे, दत्ताशेठ सप्रे आदींनी करून, या रस्त्याच्या कामाबाबत सूचना केल्या. या कामाबाबत काही नागरिक आंदोलनाच्या तयारीत असल्याचीही माहिती हाती आली आहे.
प्रभाग क्रमांक सातमधील जुना बोल्हेगाव रोडवरील गणेश चौक ते केशव कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याचे सिमेंटीकरणाचे काम सध्या सुरू झाले आहेत. या रस्त्यासाठी या प्रभागाचे नगरसेवक तथा शिवसेना (ठाकरे) पक्षाचे सभागृह नेते अशोक बडे, नगरसेविका सौ. कमलताई सप्रे, माजी नगरसेवक दत्ताशेठ सप्रे आदींनी जोरदार प्रयत्न केले होते. त्यामुळे महापौरांच्या पुढाकारातून हा रस्ता मार्गी लागत आहे. तथापि, रस्त्याच्या मधात जुन्या पाईपलाईन तसेच वीजेचे खांब आहेत. काही ठिकाणी अतिक्रमणदेखील झालेले आहे. त्यामुळे या पाईपलाईन स्थालांतरीत करण्यात याव्यात, वीजेचे खांबही स्थलांतरीत केले जावेत, आदी मागण्या स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन महापौरांसह महापालिकेचे शहर अभियंता निंबाळकर, बांधकाम अभियंता पारखे यांच्यासह भागचंदमामा भाकरे, दत्तात्रय बारस्कर, पोपटराव सप्रे, जगन्नाथ ठोकळ, संजय काकडे, दिलीप पेटकर, सतिश नेहुल, सुमित सप्रे, यश सप्रे, तुकाराम बोरुडे, भारत वामन, दीपक रोकडे, सुनिल शेखावत, शिवाजी काकडे, शुभम सप्रे, शंकर काटकर, विष्णू अकोलकर, हर्षल सप्रे, मोहसीनभाई शेख तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक सातमध्ये विकासकामांना वेग!
प्रभाग क्रमांक सातचे नगरसेवक तथा सभागृह नेते अशोक बडे व दत्तासेठ सप्रे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक सातमध्ये जोरदार विकासकामे सुरू आहेत. नुकताच राजमाता कॉलेनीमध्ये सिमेंट रोड करण्यात आला असून, दलित वस्तीमध्येही विकासकामे सुरू झाली आहेत. तसेच, नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या जुना बोल्हेगाव रोडचेही सिमेंटीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी अशोकसेठ बडे यांच्या धडाकेबाज कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
——————–