LONAR

शेगाव येथील डिस्ट्रिक चॅम्पियनशीपमध्ये बिबीतील सहकार विद्या मंदिराचा डंका!

बिबी (ऋषी दंदाले) – शेगाव येथे आयोजित पिच्याक सिलाट डिस्ट्रिक चॅम्पियनशीपमध्ये बिबी येथील सहकार विद्या मंदिराच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी नेत्रदीपक कामगिरी करत शाळेचा डंका वाजविला. या उत्तुंग यशाबद्दल सर्वत्र या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

आज पार पडलेल्या या स्पर्धांत सहकार विद्या मंदिर बिबीच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवले. वेगवेगळ्या वजन गटांमध्ये प्राविण्यप्राप्त करून शाळेचे नाव उंचावले आहे. यामध्ये यश साळवे, अनिकेत सानप, आशीष जाधव, श्रुती मिसाळ, मंजुषा दाभाडे, साक्षी जायभाये यांना हे सुवर्णपदक प्राप्त झालेले आहे. तर, आरुष राठोड, आर्यन पवार, शंतनू उगले, तन्मय काळे, निरांजली मोरे, स्नेहल नागरे यांना सिल्वर मेडल प्राप्त झाले. धनराज पालवे, अर्णव देशमुख, आर्या राजे जाधव यांना यांना ब्रॉंझ मेडल मिळाले. या यशाबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे. या यशाचे श्रेय हे विद्यार्थी त्यांच्या आई-वडील, प्रशिक्षक आणि शिक्षक यांना देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!