आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : सद्या स्थितीत वाढते तापमान, जलप्रदूषण यांचा विचार करता जल आणि निसर्ग संवर्धन करण्यास प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. पाणी आणि श्वास आता मोफत मिळत आहे. मात्र सद्याचे परिस्थितीत त्या कडे दुर्लक्ष झाले तर येत्या काळात पाणी विकत घ्यावे लागेल असा इशारा देत वाढते जल आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सर्वानी पुढे येणे काळाची गरज असल्याचे एनर्जी कॉन्व्हर्सेशन असोसिएशन, घरोंदा संस्थेच्या संचालिका डॉ. आशा राव यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहर, देहू, आळंदी पंचक्रोशीतील विविध पर्यावरण प्रेमी सेवाभावी संस्थांच्या वतीने देहू ते आळंदी पर्यावरण जागृती व संकल्प पद यात्रेचे रविवारी (ता. ३१) आयोजन करण्यात आले होते. देहूतील मुख्य देऊळवाडा आणि इंद्रायणी नदीचा घाट येथून पदयात्रेस प्रारंभ झाला. यावेळी डॉ. आशा राव मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
या प्रसंगी ग्रीन आर्मी पिंपरी-चिंचवड शहरचे प्रशांत राऊळ, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, श्री आळंदी धाम सेवा समिती अध्यक्ष राहुल चव्हाण, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे दिनकर तांबे, अमर बेंडाळे, गोविंद ठाकूर तौर, सचिन महाराज शिंदे, रानजाई प्रकल्प देहूचे प्रमुख सोमनाथ आबा मसूडगे, इंद्रायणी जल मित्र, महाराष्ट्र नवनिर्माण, आळंदी जनहित फाउंडेशन, चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन अध्यक्ष संजीवन सांगळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना-जयसिंग भाट, निलेश देशमुख, संजय पाटील, अशोक तनपुरे, मारुती तांबवाड, ॲड. प्रभाकर तावरे, शिवलिंग ढवळेश्वर, विकास साने, समीर जगताप, प्रकाश जुकंटवार, एस.आर. पाटील, राकेश मल्लिक, विठ्ठल शिंदे, जनार्धन पितळे, दिनेश कुर्हाडे, शिरीष कारेकर, सुनील वाघमारे, कुंडलिक आमले आदी पर्यावरण प्रेमी सेवाभावी संस्था प्रतिनिधींनी या पद यात्रेचे आयोजन केले होते. देहु आळंदी पद यात्रेत २५ पर्यावरण प्रेमी संस्था व प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देहू येथील श्री संत तुकाराम मंदिरात दर्शन घेऊन पद यात्रेची सुरुवात देहू येथील इंद्रायणी नदी घावर झाली. देहू येथून पद यात्रा पर्यावरण संवर्धनासह जनजागृतीचे घोषणा देत चिखली येथील राम झरा येथे पाहणी करून मोशी डुडुळगाव मार्गे देहू फाटा आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर सांगतेस जनजागृती करीत आली. येथे विविध संस्था प्रतिनिधी यांनी मनोगते व्यक्त केली. ठिकठिकाणी या पद यात्रेचे उत्स्फुरद स्वागत करीत पर्यावरण प्रेमींचे अंगावर फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली. आळंदी येथील भक्ती सोपं पुजालावर श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांचे वतीने पुष्पवृष्टी पाहुणचार करण्यात आली. येथून माउली मंदिरात दर्शन आणि आळंदी देवस्थानचे वतीने स्वागत महाप्रसाद वाटपाने देहू आळंदी पद यात्रेची सांगता झाली. माऊली मंदिरात तुकाराम माने, बल्लाळेश्वर वाघमारे, बाळकृष्ण मोरे आदींनी स्वागत केले.
पदयात्रेत सहभागी पर्यावरण प्रेमी संस्था
देहु आळंदी पद यात्रा सहभागी होणाऱ्या संस्था मध्ये ग्रीन आर्मी, आळंदी जनहित फाऊंडेशन, श्री आळंदी धाम सेवा समिती, रानजाई प्रकल्प देहू, आळंदी नगरपरिषद, आर्ट ऑफ लिविंग, निसर्गप्रेमी इन्व्हॉर्नमेंट फाउंडेशन, बदलापूर, इंद्रायणी जलमित्र, चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन, तुकाराम तनपुरे फाउंडेशन संचलित पोलीस मित्र संघटना, इंद्रायणी स्पोर्ट फाउंडेशन पुणे, सदाबहार सोशल फाउंडेशन, चिंचवड, एक्सेलेंट सोल एनर्जी, बसव सेवा ट्रस्ट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विकासभाऊ साने सोशल फाउंडेशन, चिखली, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान आळंदी, इनोवेरा टेक्नॉलॉजीज पुणे, पवना जलमित्र, इंद्रायणी सेवा फाउंडेशन आदीं सेवाभावी संस्था प्रतिनिधींनी १५ किलो मीटरची पद यात्रा उत्साहात पार पडली.