देऊळगावराजा (तालुका प्रतिनिधी) – शालेय पोषण आहारावर आता चोरट्यांची नजर असून शहरातील दोन मराठी प्राथमिक शाळेतील तांदळासह किराणा साहित्य चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, एका आठवड्यात दोन शाळेतील पोषण आहारावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन मधील पोषण आहार साहित्य असलेल्या खोलीतून तीन क्विंटल ३५ किलो तांदूळ, मूग, मटकी, मसूर डाळ, हरभरा वटाणा, जिरे, मोहरी, हळद, मसाला, तेल असा एकूण ३७ हजार ८५२ रुपयाचा किराणा साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला, शाळेचे मुख्याध्यापक करतारसिंग नायकडा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला तर चिखली मार्गावरील कमला नेहरू विद्यालयाच्या पोषण आहार साहित्य असलेल्या खोलीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तांदळासह किराणा साहित्य असा एकूण १८ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. शाळेचे मुख्याध्यापक मुरलीधर सखाराम झोरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. एका आठवड्यात दोन शाळेतील पोषण आहाराचे साहित्य चोरी गेल्याने तालुक्यातील इतर शाळाचे मुख्याध्यापक सतर्क झाले असून पोषण आहाराच्या खोलीची दक्षता घेतल्या जात आहे. मागील आठवड्यात तालुक्यातील भिवगाव, आळंद येथे चोरीच्या मोठ्या घटना घडल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा पोषण आहाराच्या साहित्याकडे वळविल्याचे दिसून येत आहे.
चांदीच्या मूर्तीसह 14 हजाराची चोरी
अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून घरातुन गौरी गणपतीची चांदीची मूर्ती, चांदीचा तांब्या व रोख ५ हजार असा एकूण १३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. श्रीकांत श्रीधरराव जगताप वय ३२ यांच्या त्र्यंबक नगर स्थित घराची हॉल आणि आतील रूमचे कडी कोंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला व ५ हजार रुपये रोख, चांदी ची ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरून चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला गौरी गणपतीची मूर्ती व चादीचा नेला अशा फिर्यादीवरून तांब्या असा एकूण १३ हजार पोलिसांनी अज्ञात असून बीट जमादार विनोद गवई तपास करीत आहे.