बुलढाणा( संजय निकाळजे) – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व समाज भूषण अर्जुनराव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांमध्ये अग्रेसर राहून कामाचा ठसा उमटविणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन साखरखेर्डा येथे शनिवार. दि. ३० डिसेंबर रोजी सन्मान करण्यात येणार आहे. बुद्धवासी वच्छलाबाई कमळाजी गवई शैक्षणिक संस्था साखरखेर्डा व दै महाराष्ट्र सारथी आणि दै चौफेर दर्पण यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन सकाळी ९ वाजता अनिकेत सैनिक स्कूल साखरखेर्डा या ठिकाणी करण्यात आली आहे. या सोहळ्याला माजी मंत्री, आमदार डॉ राजेंद्र शिंगणे, माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची उपस्थिती राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामभाऊ जाधव, उद्घाटक म्हणून प्रतिभाताई अर्जुन गवई, स्वागताध्यक्ष म्हणून ललितशेठ अग्रवाल यांची उपस्थिती राहणार आहे. तरी यावेळी अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले नारीशक्ती सन्मान पुरस्कार प्राप्त महिला विजेता साळवे-पवार, एड.वर्षा कंकाळ, शिवानी गवई, प्रतिभा उबरहंडे, आशा सरकटे, शितल मोताळकर, प्रांजली जाधव यांना देण्यात येणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार भगवान साळवे, कैलास राऊत, रवींद्र वाघ, संतोष थोरात, ज्ञानेश्वर म्हस्के यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार किसन पिसे, प्रा प्रशांत डोंगरदिवे, संदीप गवई, रामदास कोरडे, विकास सुखदाने, योगेश देवकर यांना देण्यात येणार आहे. कलाक्षेत्र पुरस्कार तेजस्विनी बंगाळे, प्रवीण डोंगरदिवे, यांना तर उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार विनोद खरात ,शेषराव भोपळे, प्रवीण गवई यांना देण्यात येणार आहे, आदर्श शिक्षक पुरस्कार पुरस्कार सोमनाथ लोमटे यांना तर उत्कृष्ट प्रशासक अधिकारी म्हणून निलेश जाधव तर शैक्षणिक क्षेत्रात डॉ सीमा धोंडगे संचित ठोसरे, विकास ठोसरे ,गणेश वायाळ यांना तर संत गाडगे बाबा समाजरत्न पुरस्कार लुकमान शेख सोनाली ठाकरे, गणेश तांगडे, भानुदास साबळे, गजानन सरकटे यांना देण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक अ. भा.ग्रामीण पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख सचिन खंडारे, चौफेर दर्पणचे संपादक गणेश पंजरकर यांचे वतीने करण्यात आले आहे.