बुलढाणा / मुंबई (बाळू वानखेडे) – मंत्रालयातील २४ कक्ष अधिकार्यांना अवर सचिवपदी तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव कि.का.शिंदे यांनी २८ ड़िसेंबररोजी याबाबतचा आदेश काढला आहे. मंत्रालयातील विविध विभागातील कक्ष अधिकारी गट ब संवर्गातील २४ अधिकार्यांना अवर सचिव या गट अ संवर्गात तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात आली आहे.
यामध्ये अशोक शिवाजी नाईकवाड़े कृषी व पदुम विभाग यांना उपायुक्त मनपा उल्हासनगर येथे पदस्थापना देण्यात आली आहे. सुधीर जया शेट्टी वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागातून सामान्य प्रशासन विभाग, महेन्द्र शांताराम पुजारी विधी व न्याय विभागातून नियोजन विभाग, गोविंद भाष्कर पवार जलसंपदा विभागातून सामान्य प्रशासन विभाग, श्रीमती इंदिरा मनिष भार्गव अनापुवग्रासवी वनामती नागपूर वरून प्रशासकीय अधिकारी वनामती नागपूर, नारायण बीरा माने गृहविभातून गृहविभाग, मनिष शेषराव मिलके सामान्य प्रशासन विभागातून उपमुख्यमंत्री (गृह) विभाग, दिनेश आप्पाजी सस्ते गृह विभागातून उपमुख्यमंत्री गृह, गोविंद चांगोजी भिसे सार्वजनिक आरोग्य विभागातून सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, सागर अर्जुन मोरे महसूल व वनविभागातून सहाय्यक आयुक्त नवी मुंबई मनपा, प्रवीण महावीर पाटील नगरविकास विभागातून मुख्यमंत्री कार्यालय, देवेंद्र पंड़ित भामरे जलसंपदा विभागातून मृद व जलसंपदा विभाग, सुप्रिया किसनराव घोटाळे मराठी भाषा विभागातून ग्रामविकास विभाग, प्रसेनजीत ज्ञानेश कारलेकर सहकार पणन व वस्ञोदयोग विभागातून कौशल्य रोजगार व उद्योजकता विभाग, प्रविण पांड़ुरंग कोळी गृहनिर्माण विभागातून कृषी, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, श्रीमती अश्विनी अशोक जाधव कृषी, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातून त्याच विभागात, श्रीमती वंदना पुनमचंद जैन सामान्य प्रशासन विभागातून सहकार, पणन व वस्ञोदयोग विभाग, सिद्धार्थ साहेबराव घोरपड़े विधी व न्याय विभागातून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,श्रीमती दिपाली सयाजी पाटील उऊवकावि मधून सहाय्यक संचालक कोल्हापूर महालेखागार, श्रीमती प्रज्ञा विजयसीह देशमुख सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातून तेथेच पदस्थापना, दीपक लक्ष्मण पिपळे सार्वजनिक बांधकाम विभागातून वित्त विभाग, श्रीमती सुगंधा दीपक पवार सामान्य प्रशासन विभागातून पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, विलास पांड़ुरंग मुरूड़कर सहकार पणन व वस्ञोदयोग विभागातून तेथेच पदस्थापना तर अजय कचरूजी पवार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांना पदोन्नतीने ग्रामविकास विभागात पदस्थापना देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव कि. का. शिंदे यांनी २८ डिसेंबररोजी काढला आहे.