बिबी (ऋषी दंदाले) – लोणार तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत येथील सहकार विद्या मंदिराच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी केली आहे. वर्ग ९ ते १२ या गटात सुमित भास्कर डोळे व जय रणमळे या वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्मार्ट हाऊस या मॉडेलला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
दिनांक २७ डिसेंबरपासून पांग्रा डोळे, तालुका लोणार या ठिकाणी आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनात सहकार विद्या मंदिर बिबीचे विद्यार्थी यांनी विविध स्पर्धेत सुयश मिळवले आहे. वर्ग नऊ ते बारा या गटात सुमित भास्कर डोळे व जय रणमळे या वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्यांनी तयार केलेल्या स्मार्ट हाऊस या मॉडलला प्रथम क्रमांक मिळाला असून, जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर वर्ग पाच ते आठ या गटात श्रुती सोळंके व निकिता सौधर या वर्ग आठवीच्या विद्यार्थिनीनी तयार केलेल्या हायड्रोफोनिक फार्मिंग या मॉडलला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. तर सामान्य ज्ञान या स्पर्धेत उज्वल डोंगरदिवे या वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या या यशाचे शाळेच्या अध्यक्षा सौ. कोमलताई झवर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक तरवडे सर तथा सर्व शिक्षक – शिक्षिकावृंदाने कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले आहे.