आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्याचे परिक्रमेत इंद्रायणी नदी संगमावरून भाविकांनी हरिनाम गजरात इंद्रायणीतुन नावेतून प्रवास करीत नदीच्या किनाऱ्यावरून इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यास लोकांत प्रबोधन करीत मरकळ, तुळापूर, भावडी मार्गे सोहळा मंगळवारी ( दि. २६ ) हरिनाम गजरात वडगाव काकडे – शिंदे येथे मुक्कामास विसावला. येथील ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले.
तत्पूर्वी मरकळ येथून पालखी सोहळ्याने परिक्रमेस तुळापूर कडे प्रस्थान केले होते. यावेळी मार्गावर रांगोळ्या पायघड्यांसह फटाक्याची अतिषबाजी कण्यात आली. विविध ठिकाणी भाविकांचे अंगावर पुष्पवृष्टी देखील झाली. सोहळ्याचे अनेक गावात ग्रामस्थ भाविकांनी हरिनाम गजरात स्वागत केले. सोहळ्यात इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त व्हावी. यासाठी समाजप्रबोधन पर प्रवचन, कीर्तन सेवा तसेच ग्रामस्थांची मार्गदर्शक भाषणे झाली. या माध्यमातून गावातून प्रबोधन, विविध धार्मिक उपचार, स्वच्छता जनजागृती करीत परिक्रमा उत्साहात गावागावांतून मार्गस्थ होत आहे. ह. भ. प. गजानन महाराज लाहुडकर, भगवान महाराज पवार, अर्जुन मेदनकर, सागर महाराज लाहुडकर, बाळासाहेब घुंडरे, गणपतराव कुऱ्हाडे आदी परिश्रम घेत आहेत
मरकळ येथील बागवान वस्तीतून हरिनाम गजरात इंद्रायणी माता की जय अशा घोषणात देत पालखी सोहळा तुळापूर कडे मार्गस्थ झाला. तुळापूर संगम तटावर इंद्रायणी मातेची आरती करण्यात आली. त्यानंतर नावेतून प्रवास करीत सोहळा हरिनाम गजरात पुढील वडगांव शिंदे – काकडे गावाकडे मार्गस्थ झाला. ठिकठिकाणी ग्रामस्थ भाविकांनी स्वागत केले.
आळंदीत इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत
पूजन, इंद्रायणी आरती, घुंडरे पाटील परिवारा तर्फे स्वागत
इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळा अंतर्गत पायी दिंडी परिक्रमा इंद्रायणी तटावरील विविध गावात समाज प्रबोधन करत मार्गस्थ होत आहे. अलंकापुरीत या परिक्रमेचा भाग म्हणून सोमवारी ( दि. २५ ) श्रीक्षेत्र आळंदीत एक दिवसाचे मुक्कामी गोपाळपुरातील पाहुणचार घेत घुंडरे आळीत बाळासाहेब घुंडरे पाटील परिवाराने आळंदी ग्रामस्थांचे वतीने रांगोळ्यांचे पायघड्या, फटाक्यांची आतिषबाजी हरिनाम गजरात अनोख्या पद्धतीने पालखी सोहळ्याचे सकाळच्या विसाव्यात स्वागत केले. यावेळी इंद्रायणी आरती, पूजन उत्साहात करण्यात आले. यावेळी वारकरी संप्रदायातील मान्यवरांनी जनजागृती केली.
इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळा संयोजक गजानन महाराज लाहुडकर, व्यवस्थापक श्री सागर महाराज लाहुडकर, व्यवस्थापक नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, उद्योजक सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब घुंडरे, नितीन घुंडरे, सुनील घुंडरे, समीर घुंडरे, नगरसेविका मालन घुंडरे, प्राजक्ता घुंडरे, किरण घुंडरे, कृष्णा घुंडरे, विष्णू घुंडरे, मारुती कवितके, श्री आळंदी धाम सेवा समिती अध्यक्ष राहुल चव्हाण , दौन्डकर महाराज आदी उपस्थित होते.
आळंदी येथील गोपाळपुरातून इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळा हरिनाम गजरात स्वामी महाराज मठा समोरून चाकण रस्ता मार्गे घुंडरे आळी येथील पवन मावळ धर्मशाळॆत सकाळच्या विसाव्यास विसावला. येथे इंद्रायणी आरती, स्वागत सत्कार बाळासाहेब घुंडरे पाटील परिवाराचे वतीने पाहुणचार हरिनाम गजरात झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोविंद ठाकूर तौर, हनुमंत बवले, अर्जुन मेदनकर , बाळासाहेब घुंडरे, गजानन महाराज लाहुडकर आदींचा सत्कार करण्यात आला. घुंडरे पाटील परिवाराचे वतीने पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत – पाहुणचार करण्यात आला.
मरकळ चौकात उद्योजक अशोक कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे यांनी स्वागत केले. आळंदी येथून पालखी सोहळा हरिनाम गजरात दुपारच्या विसाव्यास सोळू येथील मंदिरात सोहळ्याचे स्वागत पूजा माजी सरपंच भाऊसाहेब ठाकूर, संत मुक्ताबाई भजनी मंडळ, सोळू ग्रामस्थ यांनी स्वागत केले. सोळू येथून सोहळा रात्रीचे मुक्कामास जनजागृती करीत मरकळ येथील श्री केशवराज संस्थान येथे सोहळा मुक्कामास विसावला. येथे मरकळ ग्रामस्थ यांनी स्वागत केले. रात्री आरती, धार्मिक कार्यक्रम हरिनाम गजरात झाले.
दरम्यान तत्पूर्वी सोहळ्यात ओम हॉटेलचे मालक बाळासाहेब बबन येळवंडे यांचे सह ग्रामदेवता भैरवनाथ महाराज मंदिर निघोजे येथे सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी ग्रामस्थांसह भाविकांना आवाहन करीत जनजागृती करण्यात आली. यावेळी गणपतराव पाटील कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर घुंडरे पाटील, रोहिदास कदम, अमर गायकवाड, सोमनाथ बेंडाले, गोविंद ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळा निघोजे येथून चिंबळी मार्गे केळगाव येथून आळंदी कडे मार्गस्त झाला होता. आळंदी येथील गोपाळपुरामध्ये रात्रीचा मुक्काम घेऊन सोमवारी सोहळा सोळू मार्गे मरकळ येथे एक दिवसाचे मुक्कामास हरिनाम गजरात विसावला. नगरेची रचावी | जलाशये निर्मावी | महावने लावावी | नानाविधे या संत चरणा प्रमाणे समाज प्रबोधन करीत इंद्रायणी माता परिक्रमा पायी पालखी सोहळ्याचे परिसरातून हरिनाम गजरात फटाक्यांचे आतिषबाजीत मार्गस्त झाला. भाविकांनी दर्शनास यावेळी गर्दी करून समाजप्रबोधनाचे उपक्रमास हजेरी लावली.