देऊळगाव राजा (राजेंद्र डोईफोडे) – सावखेड भोई शिवारात असलेल्या लघु प्रकल्पातून सिंचनासाठी पाण्याचा उपसा केला जात होता. दरम्यान, 22 डिसेंबर रोजी मृत व जल संधारण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठचे आदेश नसताना मोटारी जप्त करण्यासाठी गेले असता शेतकरी व त्यांच्यात वाद झाले आणि सदर शेतकऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शेतकऱ्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक होऊन मृत व जलसंधारण कार्यालयात सुमारे तिन तास ठिय्या आंदोलन केले. उपविभागीय अभियंता लाकडे यांच्या आश्वासनाने सदर आंदोलन स्थगित झाले.
सावखेड भोई शिवारात असलेल्या लघु प्रकल्पातून शेती सिंचनासाठी पाण्याचा उपसा सुरू होता.मृत व जलसंधारण उपविभाग येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोटारी जप्त करण्याचे कोणतेही आदेश नसताना कार्यालयातील कर्मचारी गजानन काळुसे व पायघन यांनी मोटारीचा विद्युत पुरवठा कट करून मोटारी जप्त करण्याची कार्यवाही केली. दरम्यान, येथे पोहोचलेल्या काही शेतकऱ्यांसोबत त्यांचा वाद झाला. आणि सदर कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून सोळा शेतकऱ्यांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत सदर कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करून शेतकऱ्यावर दाखल केलेले गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घ्यावे. यासाठी जलसंधारण कार्यालयात सुमारे तीन तास शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन केले. दरम्यान, कार्यालयातील उपविभागीय अभियंता यांच्याशी सकारात्मक चर्चा नंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस विनायक भानुसे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रमोद घोंगे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, सचिव जहीर पठाण, शहराध्यक्ष विजय खांडेभराड, ओम प्रकाश भुतेकर, रवी इंगळे, रावसाहेब गाढवे, अजमत खान, सुरेश कोल्हे, अनिस शाह, असलाम खान, याच्यासह सावखेडभोई माजी सरपंच अशोक जाधव, जनार्दन ढोणे, सुखदेव शेळके, अमोल टेकाळे, सर्जेराव माने, महेंद्र जाधव, रामराव वाघमारे, काशिनाथ जाधव, नारायण जाधव, सुखदेव गांधिले, संतोष मगर आदी शेतकरी उपस्थित होते.