– अंगणवा़ड्या ताब्यात घ्या, पर्यायी आहार शिजवण्याची व्यवस्था करा!
– राज्य बालविकास आयुक्तांची जिल्हा कार्यक्रम अधिकारी, सीड़ीपोओंना ताकीद!
बुलढाणा/मुंबई (बाळू वानखेडे) – अंगणवाड़ी कर्मचार्यांचा गेल्या ४ ड़िसेबरपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू आहे. मागण्यांबाबत कोणतीही सहानुभूती न दाखवता उलट हा संप मोड़ीत काढण्याचा ड़ाव शासनाने आखला आहे. संबंधित अंगणवाड़ी केंद्र ताब्यात घेऊन पोषण आहार शिजवण्याची पर्यायी व्यवस्था करा, अशी सक्त ताकीद राज्याच्या एकात्मिक बालविकास विकास सेवा योजना आयुक्त रूबल अग्रवाल यांनी संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी दिली आहे. यामुळे मात्र अंगणवाड़ी कर्मचारी संताप व्यक्त करत आहेत.
अंगणवाड़ी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाड़ी सेविका यांना अनेक वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागते. कोरोना काळातील त्यांचे काम तर वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या मानधनात सन्मानजनक वाढ करावी, चथुर्थश्रेणी लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील दोन लाखांच्या वर अंगणवाड़ी कर्मचार्यांनी गेल्या ४ ड़िसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. तर नागपूर हिवाळी अधिवेशनावर रेकॉर्ड़ब्रेक मोर्चादेखील काढला. त्यामुळे अंगणवाड़ी कर्मचार्यांच्या आशा पल्लवित झाल्या. पण शासनाने मात्र याला कोणताही प्रतिसाद न देता उलट संप मोड़ीत काढण्याचा ड़ाव आखल्याचे दिसत आहे. याबाबत राज्याच्या एकात्मिक बाल सेवा योजना आयुक्त रूबल अग्रवाल यांनी संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी व एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांना २२ ड़िसेबररोजी एक आदेश काढला. यामध्ये नमूद आहे, की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंगणवाड़ी लाभार्थ्यांना वर्षातून किमान तिनशे दिवस आहार पुरवठा करणे बंधनकारक आहे. अंगणवाड़ी कर्मचारी संपावर असल्याने बालके पोषण आहारापासून वंचित आहेत. त्यामुळे बालकांना पोषण आहार मिळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी मुख्य पर्यवेक्षिका यांनी स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने अंगणवाड़ी केंद्र ताब्यात घ्यावे, महिला बचत गट, आशा वर्कर व इतरांकडून पोषण आहाराची सोय करावी. याबाबत ग्रामपंचायतीचे सहकार्य घ्यावे. नागरी भागात ज्या बचत गटामार्फत आहार पुरवठा केला जातो. त्यांच्यामार्फत आहार वितरणाची व्यवस्था करावी. संपाकाळातील मनधनात कापत करावे. पोषण ट्रॅकवर अंगणवाड़ीनिहाय माहिती भरण्याची जबाबदारी संबंधित मुख्य सेविकांनी पार पाड़ावी. आरोग्य तपासणी, लसीकरणासह इतर जबाबदारी संबंधित वैद्यकीय अधिकारी, एएनएमसह कर्मचारी यांनी पार पाड़ावी, असेही सदर आदेशात म्हटले आहे. एकंदरीत शासनाने अंगणवाड़ी कर्मचार्यांच्या मागण्यांची दखल न घेता उलट संप मोड़ीत काढण्याचा प्रयत्न चालविल्याने या कर्मचार्यांमध्ये शानानाविषयी रोष व्यक्त केला जात आहे.
शासन हुकूमशाही पध्दतीने वागत असून, बेमुदत संप सुरूच राहणार आहे. मुंबई येथील आझाद मैदानावर हजारो अंगणवाड़ी कर्मचार्यांचे उपोषणदेखील सुरू आहे. उद्या, २७ ड़िसेबर रोजी आयुक्त रूबल अग्रवाल यांनी काढलेल्या त्या अन्यायकारक आदेशाची संबंधित सीड़ीपोओ कार्यालयासमोर होळी करण्यात येणार आहे.
– कॉ. नंदकिशोर गायकवाड़, जिल्हाध्यक्ष, ऑल इंडिया ट्रेड़ युनियन काँग्रेस (आयटक), बुलढाणा
————-