Chikhali

साकेगाव येथील विकास निकाळजे यांची BSF मध्ये निवड

चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील साकेगाव येथील सामान्य कुटुंबातील विकास कडूबा निकाळजे या युवकाने उरात जीद्द बाळगून परिस्थितीची जाणीव ठेऊन अतिशय मेहनत घेऊन केंद्राच्या BSF मध्ये नोकरीला गवसणी घातली आहे. त्याबद्दल त्याचे परिसरात कौतुक होत आहे.

विकासचे बालपणीचे शिक्षण सातवीपर्यत जि.प.शाळेत गावातच झाले. पुढील शिक्षण दहावीपर्यंत गावातील शिवाजी विद्यालयात झाले. घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे आई वडिलांनी शेती मजुरी करून पुढील शिक्षण शिकवले. विकासने या आगोदर प्रयत्न केले होते त्याला यश न आल्याने विकास पुन्हा त्या जोशाने न खचाता त्याच जिद्दीने पुन्हा पेटून आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज करून आज त्याने BSF मध्ये SC प्रवर्गामधून प्रथम येऊन गावचे तालुक्याचे नाव उंचावले आहे. सर्व क्षेत्रातून त्याचे कौतुक /अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!