बिबी (ऋषी दंदाले) – येथील मातोश्री वृद्धाश्रमात मोफत शस्त्रक्रिया शिबीर पार पडले. मेहकर येथील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. गजानन शेळके यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आपली सेवा या शिबिरात दिली. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
नेत्राच्या या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने या उक्तीप्रमाणे काल दि. २४ डिसेंबररोजी मातोश्री वृद्धाश्रम बिबी येथे वृद्धाश्रमातील वृद्धांचा अंधकार दूर करण्यासाठी मेहकर येथील सुप्रसिद्ध नेत्र रोगतज्ञ डॉ.गजानन शेळके यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाज सेवा या हेतूने वृद्धाश्रमातील वृद्धांची नेत्र तपासणी करून त्यांना लागणारे औषधी उपचार व शस्त्रक्रियेस पात्र वृद्धास माफक दरात शस्त्रक्रिया करण्याची ग्वाही दिली. यावेळी उपस्थित डॉक्टर शेळके यांच्यासह त्यांचे सहकारी व मातोश्री वृद्धाश्रमाचे सर्व कर्मचारीवृंद उपस्थित होते. डॉ. शेळके यांच्या या सामाजिक दातृत्वाबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.