Chikhali
अंत्री खेडेकर येथे सोमवारी चिखली तालुका मराठी पत्रकार परिषदच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर
चिखली (कैलास आंधळे) – तालुक्यातील अंत्री खेडेकर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ वा वर्धापनदिनानिमित्त एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, बुलढाणा जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर,जिल्हा संघटक नारायण दाभाडे, विभागीय सचिव अमर राऊत, शेगाव तालुका पत्रकार संघाचे सचिव नंदू कुलकर्णी यांच्या उपस्थितीत चिखली तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने तालुक्यातील सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच, याप्रसंगी सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत असलेल्या आधार अपडेट, आयुष्यमान भारत कार्ड व पीएम किसानसाठी दिनांक ४ डिसेंबर२०२३ रोजी सोमवारला मराठी पत्रकार संघाच्यावतीने शिबीरदेखील घेतले जाणार आङे. चिखली तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून चिखलीचे तहसीलदार सुरेश कव्हळे,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आरोग्य विभागाचे चिखली तालुका अधिकारी रिंगे साहेब, प्रमुख पाहुण्यांमध्ये अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील, चिखली तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर सवडतकर यांची उपस्थिती राहणार आहे. तरी मेरा खुर्द,अंत्री खेडकर,मेरा बुद्रुकसह चिखली तालुक्यातील सर्व नागरिकांनी व पत्रकारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आव्हान चिखली तालुका मराठी पत्रकार संघाच्या सलग्न डिजिटल मीडियाच्यावतीने करण्यात आले आहे.