बिबी (ऋषी दंदाले) – अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांना पीक विमा कंपनीने तातडीने २५ हजार रूपयांची हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी लोणार तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड व त्यांच्या सहकार्यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या लोणार तालुक्यातील शेतकर्यांना विमा पंचनामा तात्काळ हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी व खरीप हंगामामध्ये पडलेले कोरड्या दुष्काळाची नुकसान भरपाई व पीक विम्याची शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याची मागणी आज (दि.४) लोणार नायब तहसीलदार परळीकर यांच्याकडे केली आहे. शेतकरी हा कोरड्या दुष्काळामध्ये व यावर्षी कमी पाऊस शेतकर्याचे अतोनात नुकसान झाले आहे. तरी विमा कंपनी खरीप हंगामाचा पीक विमा देण्यास टाळाटाळ करीत असल्यास विमा कंपनीवर लोणार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची मागणी तालुका कृषी अधिकारी लोणार यांच्याकडे केली. वरील मागणी मान्य न झाल्यास १८ डिसेंबररोजी लोणार तालुका कृषी अधिकारी कार्यालय लोणारसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष सहदेव लाड व त्यांचे सहकारी यांनी दिला आहे.