– पत्रकारांनी ठेवलेल्या आरोग्य शिबिराला अनेक सरपंचांची दांडी
चिखली (कैलास आंधळे) – तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ वर्धापन निमित चिखली तालुका डिजिटल मीडियाच्या वतीने ठेवलेल्या आरोग्य तपासणी, पीएम किसान, आयुष्यमान कार्ड, आधार अपडेट,डोळे तपासणी, बीपी व शुगर तपासणी या शिबिराला शेकडो नागरिकांनी प्रतिसाद दिला. ह्या कार्यक्रमाला कृषी अधिकारी सवडकर साहेब, चिखलीचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी कार्यक्रमाला भेटी देऊन सर्व कामाची विचारपूस केली व येणार्या काळामध्ये गावोगावी असे शिबिर ठेवण्याच्या मानस बोलून दाखवला.
चिखली तालुका डिजिटल मीडियाच्यावतीने ठेवलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून चिखली तालुका आरोग्य अधिकारी विशाल रिंगे साहेब, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील, चिखलीचे पोस्टमास्टर इंगळे साहेब, महसुलचे काकडे साहेब, डॉक्टर वायाळ साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. डिजिटल मीडियाच्यावतीने ठेवलेल्या आरोग्य शिबिराला शेकडोच्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांच्या उपस्थित दिनांक ४ डिसेंबर रोजी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला डॉ.वायाळ साहेब, अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील, तालुका आरोग्य अधिकारी विशाल रिंगे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. या शिबिराच्या कार्यक्रमाला चिखली तालुका आरोग्य विभागाची तज्ञ टीम उपस्थित होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट दिनेश जपे, प्रास्ताविक डिजिटल मीडिया तालुका सचिव एकनाथ माळेकर व आभार प्रदर्शन सुनिल अंभोरे यांनी केले. यावेळी डिजिटल मीडियाचे सर्व पत्रकारासह अनेक नागरिकांची उपस्थिती होती.