घारोड ता खामगाव-(ब्रेकिंग महाराष्ट्र) बेइमानी या शब्दाची व्याख्या आता खालच्या स्तरापासून ते शेवटच्या स्तरापर्यंत असल्याचे आता विविध राजकारणाच्या माध्यमातून समोर येत आहे अशा समस्या गाव खेड्यातही कायम असून आता काय ते गटार काय ते गाव तो रस्ता काय ग्रामपंचायत ओके अशी परिस्थिती तालुक्यातील घारोड गावांमध्ये निर्माण झाली आहेअंतर्गत नाही रोड ते त्याचेच नाव घारोड अशी ओके मधील परिस्थिती गावात पहावयास मिळत आहेत सध्या गावातील सरपंच सचिव आणि गाव पुढारी पूर्णपणे असून त्यामुळे आता ग्रामस्थांवर काय ते गाव काय ते गटार काय तो रस्ता काय त्या नेहमीच्या कायम असलेल्या समस्या सर्व ओके आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे
स्थानिक भवानी माता मंदिराजवळ असलेल्या मातंग वस्ती मध्ये गेल्या दोन वर्षापूर्वी सिमेंट रस्ता झाला होता मात्र सदर रस्ता कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याने सदर चालू असतात गायब झाला आहे त्यामुळे आता या रस्त्याच्या ही चोऱ्या व्हायला लागल्या की काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे
शासनाच्या वित्त आयोगाचे लाखो रुपये खर्च होऊन आजच्या घारोड गावात गटारांचे साम्राज निर्माण झाले आहे. गावातील अंतर्गत रस्ते पार करताना गावकऱ्यांना करत करावी लागत आहे.
गावात अटाळी रोड कडून येणाऱ्या भवानी माता मंदिराजवळ रस्त्यात गटारे साचली आहेत. लहान मुलांना शाळेकडे, शेतकरी व महिलांना शेताकडे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे गावकरी तसेच शाळकरी मुलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणीं दुचाकी पडून अनेकांचे अपघात घडत आहेत. पावसाच्या पाण्यामुळे या ठिकाणीं गटारे साचली असल्याने डासांचा प्रादुर्भाव होऊन आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे . या बाबत ग्रामपंचायत प्रशासन सुस्त असून १५ व्या वित्त आयोगाचा लाखो रुपये निधी गावात खर्च होत असताना ह्या असुविधा कश्या असा प्रश्र्न गावकरी विचारू लागले आहेत.