KokanWomen's World

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी दीपिका कोतवडेकर

– प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे यांनी केली नियुक्ती, सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव!

मुंबई (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या (शरद पवार गट) रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी दीपिका कोतवडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे यांनी ही नियुक्ती केली असून, दीपिका कोतवडेकर या सुतार समाजातील महत्वपूर्ण महिला नेत्या असल्याने त्यांचे राज्यभरातील सुतार समाजातून अभिनंदन करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्ष मजबूत करणे व पक्षाची ध्येय धोरणे सामान्यांपर्यंत पोहोचवून तो वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे यांनी दीपिका कोतवडेकर यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात नमूद आहे. कोतवडेकर यांनी चिपळून शहराध्यक्ष पदावर दीर्घकाळ काम केलेले असून, त्या सुतार समाजातील महत्वपूर्ण नेत्या आहेत. आगामी नगर परिषद निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर त्यांना बढती देत, महिला आघाडी रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री तथा राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा खा. सुप्रियाताई सुळे, माजी आमदार रमेश कदम यांच्या निकटवर्तीय असलेल्या दीपिका कोतवडेकर यांनी चिपळून शहरात पक्षाचे विविध उपक्रम राबवून तळागाळात पक्ष मजबूत केलेला आहे. तसेच, त्यांना मोठा जनाधार आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, माजी आमदार रमेश कदम यांच्यासह सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!