– तब्बल दोन तांस शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी वाचविला महिलेचा डोळा!
चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील मालगणी येथील ज्योती गायकवाड या महिलेच्या डोळ्यातून चक्क ६० जिवंत अळ्या काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चिखली येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मोरवाल यांनी याबाबतची किचकट शस्त्रक्रिया केली आहे. शेतात काम करत असताना डोळ्याला ढेकूळ लागल्याचे कारण झाले, आणि या महिलेच्या डोळ्याला दुखापत झाली. त्रास असह्य झाल्याने त्या मोरवाल हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. तपासणीअंती अवघड शस्त्रक्रियेने महिलेचा डोळा खराब होण्यापासून वाचला आहे. तब्बल दोन तास शस्त्रक्रिया चालली असून, अत्यंत सावधपणे एक-एक अळी काढावी लागली. मोरवाल हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली.
शेतात मोलमजुरी करणार्या या महिलेला शेतात काम करताना अचानक डोळ्यात मातीचे ढेकूळ लागले होते. तेव्हापासून डोळ्यात त्रास होत होता. सुरुवातीला तिने याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्रास जास्त वाढल्यावर या महिलेने डॉ. स्वप्नील यांच्याकडे जाऊन डोळे तपासले. तेव्हा त्यांच्या डोळ्यात अळ्या झाल्याचे डॉक्टरांना समजले. डॉक्टरांनी तात्काळ त्या अळ्या काढण्याचे ठरवले. डोळ्याचा त्रास सुरू झाल्यानंतर या महिलेने घरगुती इलाज करण्यात वेळ घालवला नाही, म्हणून डोळे वाचू शकले. याप्रकणात कोणतीही दिरंगाई किंवा चूक ही जीवावर बेतू शकली असती. शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती ठीक असून, तिला कोणताही त्रास जाणवत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु चक्क डोळ्यांमध्ये एक मातीचे ढेकळ आणि त्यामध्ये ६० अळ्या यामुळे डॉक्टरदेखील काही काळ हादरले होते. एकंदरीत या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे डॉक्टरांवर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे. तसेच, या महिलेकडून डॉक्टर स्वप्नील मोरवाल यांनी कुठलीही फीसुद्धा घेतलेली नाही.
————–
चिखली तालुक्यातील मालगणी येथील ज्योती गायकवाड असे या महिलेचे नाव असून, चिखली येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मोरवाल यांनी डोळ्यातून अळ्या काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. अळ्या काढताना डॉक्टर यांना तब्बल दोन तासांचा वेळ लागला. एक-एक अळी डोळ्यातून वेचून काढावी लागली.
—————-