लोणार (उद्धव आटोळे) – तालुक्यातील तीनही ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून, विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केला. देऊळगाव वायसाच्या सरपंचपदी सोपान सोनुने, सोमठाणा-खापरखेड गट ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी सुमित्रा परशराम शिंदे, तर पार्डी सिरसाठ-बोरखेडी गट ग्रामपंचायत सरपंचपदी शोभा पंजाबराव शिरसाठ हे निवडून आले आहेत. या निवडणुकी अतिशय अतितटीच्या झाल्या होत्या.
तालुक्यातील तीनही ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून, यामध्ये देऊळगाव वायसा, गट ग्रामपंचायत पार्डी सिरसाठ-बोरखेडी, गट ग्रामपंचायत सोमठाणा-खापरखेडा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या मध्ये देऊळगाव वायसा ग्रामपंचायतचे नऊ सदस्यसह विजयी उमेदवार सोपान आसाराम सोनुने सरपंच, वार्ड क्रमांक एक गणेश श्रीराम सोनुने (315),आत्माराम लक्ष्मण सोनुने (323),अल्का संतोष थोरवे (318),वार्ड क्रमांक दोन मध्ये गजानन श्रीराम सोनुने(246),स्वाती राजकुमार रानबावळे(238),अर्चना विश्वास सोनुने(267),वार्ड क्रमांक तीन लहू शहाजी फड(275),वनिता संजय नागरे(256),मंगल सुदाम पंजरकर(268), सोमठाणा-खापरखेड गट ग्रामपंचायत मध्ये सुमित्रा परशराम शिंदे(537) सरपंच पदासाठी निवडून आले. वार्ड क्रमांक एक मध्ये प्रल्हाद नामदेव शिंदे (206),छाया गुलाब साळवे(282),अर्चना परमेश्वर शिंदे (252),वार्ड क्रमांक दोन मध्ये गोपाळ गोविंदा म्हस्के (307),अनिल बाबुसिंग राठोड (310),पुष्पा पंडित राठोड (280),वार्ड क्रमांक तीन मध्ये पंजाब संपत वानखेडे (315),ज्योती रमेश भागडे (330),अनिता अनिल वानखेडे (306), पार्डी सिरसाठ-बोरखेडी गट ग्रामपंचायत सरपंच पदासाठी शोभा पंजाबराव शिरसाठ (538)विजयी झाले. वार्ड क्रमांक एक मध्ये गणेश डीगांबर शिरसाठ( 215),वंदना संदीप गवई (205), अश्विनी मुरलीधर शिरसाठ (अविरोध),वार्ड क्रमांक दोन मध्ये अंबादास चंद्रभान गवई (254),भारती वैभव बाभुळवार (240),अश्विनी रामकृष्ण थोरात (222),वार्ड क्रमांक तीन मध्ये रेखा विनोद थोरात (173),वैशाली मोहन नवघरे (अविरोध),सतीश त्रंबक नखाते (अविरोध). या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी गिरीष जोशी, निवडणूक निर्णय अधिकारी एल.एस.चोले, सहाय्यक म्हणून संतोष राठोड यांनी काम पहिले. या वेळी लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
https://breakingmaharashtra.in/grampanchayat_election-7/