ChikhaliVidharbha

चिखली तालुक्यात भाजपला जनादेश; ९ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा!

चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काल मतदान झाल्यानंतर आज दि. ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणीअंती निकाल हाती आले. या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाची सरशी झाली असून, चिखली मतदारसंघामध्ये भाजपाला ग्रामीण जनतेने स्पष्ट कौल दिल्याचे निदर्शनास येत आहे. या निवडणुकीत सरपंच व ग्रामपंचायत सदस्य म्हणून विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी अभिनंदन केले आहे. नऊ ग्रामपंचायतींवर भाजपच्या विचारधारेचे सरपंच व सदस्य निवडून आल्याचा दावा भाजपने केला आहे.

चिखली मतदारसंघातील ग्रामपंचायतींवर भाजपचा विजयीध्वज फडकवणारे नवनिर्वाचित सरपंच व उमेदवार रूपाली केशव तरमळे मौजे पिंपळगाव सराई, अनुराधा गणेश भुसारी घाटनाद्रा, उज्वला पुरुषोत्तम जाधव मकरद्वाज खंडाळा, शरद जवंजाळ डोंगरशेवली, रवींद्र इंगळे करणखेड, रमेश अवचार मेरा खू., वाहिद शेख हमीद अंबाशी, रवी इंगळे करणखेड, विश्वास पाटील धानोरी, अरुण सरनाईक शेलगाव जहांगीर यांचे ानसंपर्क कार्यालयात सत्कार करून आ.श्वेताताई महाले यांनी अभिनंदन केले. यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष सुनील पोफळे, अ‍ॅड. मोहन पवार, पंचायत समिती सदस्य संदीप उगले, युवा मोर्चाचे जिल्हा संपर्कप्रमुख पद्मनाभ पाळेकर, शंकरराव तरमळे, पंचायत समिती माजी सदस्य संजय तरमळे, लक्ष्मणराव शेळके, संतोष काळे, तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, विलास इंगळे, पंजाबराव देशमुख, शिवानंद गायकवाड, मोहन सावळे, शिवशंकर सुरडकर, अझर इनामदार, सुधाकर सुरडकर, अमोल सावळे, ईश्वर रक्ताडे, विठ्ठल गिरी, गोपाल महाले, नारायण इंगळे, रंगराव अंभोरे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आता राजकारण बाजूला ठेवून विकासात सहभागी व्हा – आ. श्वेताताई महाले

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारानंतर मतदान पार पाडले व आज निकाल हाती आले. यामध्ये चिखली मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी बहुसंख्य ग्रामपंचायतींमध्ये मतदारांनी कौल दिला. आ. श्वेताताई महाले यांनी ग्रामीण भागात केलेल्या विकासकामांची ही परिणीती असल्याचे या निकालावरून स्पष्ट होते. या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आ. महाले यांनी ग्रामपंचायतींचे निकाल हे समाधानकारक असून मतदारांचे आपण मनःपूर्वक धन्यवाद देतो असे म्हटले. याशिवाय, अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्याच दोन गटांमध्ये चुरशीची निवडणूक झाली. परंतु, आता निकाल हाती आले असून, निवडून आलेल्या उमेदवारांनी आपसामधील राजकीय मतभेद बाजूला ठेवावे व राजकारण विसरून आता मतदारसंघातील व आपल्या गावातील विकासाच्या प्रक्रियेमध्ये खुल्या दिल्याने सहभागी व्हावे; आपण प्रत्येक गावाच्या विकासासाठी मदतीचा हात पुढे करण्यात सदैव तयार असल्याचे आ. श्वेताताई महाले म्हणाल्या.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!