KhamgaonMEHAKAR

मेहकर, खामगावात प्रस्थापितांना धक्के!

मेहकर/खामगाव (प्रतिनिधी) – मेहकर व खामगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांतदेखील महाविकास आघाडीची सरशी झाल्याचे चित्र असून, विद्यमान आमदारांसाठी हे निकाल धक्कादायक ठरले आहेत. अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धूळ चारत नवख्यांनी बाजी मारली आहे. या निवडणुका गावकी, भावकीभोवतीच फिरल्या असल्याचेही दिसून आले आहे.

मेहकर तालुक्यातील सात ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज ६ नोव्हेंबर रोजी पार पड़ली. यामध्ये बहुतांश ठिकाणी सरळ व प्रतिष्ठेची लढत झाली. यामध्ये जानेफळ सरपंचपदी काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य सदस्य गजानन वड़णकर यांच्या पत्नी सौ.रूपाली वड़णकर विजयी झाल्या आहेत. कळंबेश्वर सरपंचपदी सौ. विद्या सुभाष खुरद, मारोतीपेठ सरपंचपदी सौ. शिलाबाई गजानन गवई, बेलगाव सरपंचपदी सौ.विमलताई अर्जुनराव वानखेडे, बार्‍हई सरपंचपदी सौ.उषा निधीन पवार, घाटबोरी सरपंचपदी राजकुमार महादेवराव पाखरे व चायगाव सरपंचपदी सौ.पुष्पाताई प्रभाकर देशमुख हे निवड़ून आले आहेत. यामध्ये काही ठिकाणी प्रस्थापितांना धूळ चारत नवख्यांना संधी मिळाली आहे.
खामगाव तालुक्यातील अटाळी सरपंचपदी दुर्गा हरिष काटोले, घारोड़ सरपंचपदी वैभव किशोर ठाकरे, जयरामगड़ सरपंचपदी वनिता सुनील जाधव, माटरगाव गेरू सरपंचपदी गोकर्णा अशोक जगताप, रोहणा सरपंचपदी सविता संतोष गव्हाळे, तर जयपूर लांड़े सरपंचपदी भारती गोपाल लांड़े हे निवडून आले आहेत. आमच्याच पक्षाचे जास्त सरपंच निवड़ून आल्याचा दावाही आजी – माजी आमदारांकडून केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!