नंदुरबार (ब्रेकिंग महाराष्ट्र) नंदुरबार जिल्ह्यात गेल्या ५ दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. नवापूर आणि अक्कलकुवा तालुक्यांत अतिवृष्टीमुळे सर्वाधिक जास्त नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. मुसळधार पावसाने घरांची पडझड तसेच पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांना जोडणारे लहान फरशी पूल व रस्ते वाहून गेले आहे. शेकडो हेक्टर वरील शेतीचे नुकसान झाले आहे.
आतापर्यंत नवापूर तालुक्यात ३४ च्या जवळपास घरे कोसळली आहेत. एक महिला पुरात वाहून मृत झाली आहे. तर अक्कलकुवा तालुक्यात २४ घरे कोसळून नुकसान झाले आहे. यामध्ये शाळांचा देखील समावेश आहे. अक्कलकुवा तालुक्यातील पावसामुळे एका महिलेचा बळी गेला आहे.
महसूल व कृषी विभागाकडून पंचनाम्यांना गती देण्याची गरज आहे. अतिवृष्टीने पुरामुळे नुकसान झालेल्या घरांची शेतीचे नुकसान भरपाईसाठी पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु अनेक गावातील तलाठी पंचनामे करण्यासाठी वरून आदेश आले नसल्याची माहिती नागरिकांना देत असल्याची माहिती समोर आली आहे.