AalandiMaharashtra

आळंदी मातोश्री वृद्धाश्रमात अन्नदान

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील मातोश्री वृद्धाश्रमात माजी विरोधी पक्ष गटनेते, माजी उपनगराध्यक्ष आदित्यराजे घुंडरे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देऊन अन्नदान करण्यात आले. तसेच दिघी येथील स्नेहछाया सामाजिक प्रकल्पास भेट देऊन वाढदिवसानिमित्त एक एच.पी पाण्याची मोटार भेट देऊन सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
वाढदिवसनिमित्त मातोश्री वृद्धाश्रम आळंदी येथे अन्नदान प्रसंगी केक कापून, महिलांनी औक्षण केले. यावेळी अन्नदान आणि महिला,मुले यांचेशी संवाद साधण्यात आला. या प्रसंगी सहकारी, मित्र, मातोश्री वृद्धाश्रम मधील महिला आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी घुंडरे पाटील यांनी सर्वांचे मी ऋणी आहे असे सांगत सर्वांचे आशीर्वाद, प्रेम सदैव सोबत रहावेत असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!