चिखली (तालुका प्रतिनिधी) – बचत गट हे महिलांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. महिला सक्षमीकरणात बचत गटाचा मोठा वाटा असतो. त्यामुळे बचत गटांना कर्ज देऊन पतसंस्थेने महिला सक्षमीकरणासाठी हातभार लावावा, असे आवाहन चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी अंढेरा येथे दि. २२ ऑक्टोबररोजी कलावती अर्बन पतसंस्थेच्या उदघाटन प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्याम उमाळकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून विजय अंभोरे, आमदार किरण सरनाईक, आमदार धीरज लिंगाडे, सौ.जयश्री शेळके, डॉ. गणेश मांटे, मनोज कायंदे, भगवान मुंढे, अशोक पडघान, श्रीकृष्ण जेऊघाले, समाधान शिंगणे, दादाराव खार्डे, नितीन शिंगणे, दिलीप झोटे, गजानन काकड, इरफान भाई, राजू चित्ते, भगवान नागरे, किसनराव सानप, अशोक पवार, रुपाली आंबिलकर, गजानन चेके, प्रमोद घोंगे, गोविंदराव नागरे, डॉ.रमेश दंडे, दैनिक देशोन्नतीचे प्रतिनिधी प्रताप मोरे, खंडू मांटे, एकनाथ काकड, प्रमोद सानप, जे. के. सानप, पंढरी नागरे, पत्रकार बांधव हे उपस्थित होते.
उदघाटनप्रसंगी प्रथमतः प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष दिलीप सानप यांनी उदघाटन दिवशीच नवीन ठेवीदारांनी एक कोटी रुपयांची ठेव जमा करुन बँकेचा पाया मजबूत केला असे सांगून मान्यवरांचे आभार मानले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामभाऊ उमाळकर, किरणराव सरनाईक, अशोकराव पडघान, भगवानराव मुंडे, जयश्री शेळके, राहुलभाऊ बोंद्रे, विजय अंभोरे, आदींनी पतससंस्था कशी चालवावी? यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रख्यात कवी अजीमनवाज राही तर आभार प्रदर्शन अर्जुन आंधळे यांनी केले.