लोणार (उद्धव आटोळे) – शिवसेना (ठाकरे) पक्षाचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी लोणार येथील धारतीर्थावर श्रद्धास्नान करून सविनय कायदेभंग केल्याप्रकरणी, तसेच स्नानास बंदी असलेले बोर्ड हटविल्याने पुरातत्व विभागाच्या तक्रारीवरून डॉ.बच्छिरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. पुरातत्व खात्याच्या या मोगलाईविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली असून, शिवसेना (ठाकरे) पक्षाच्यावतीने आत्मक्लेष आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
लोणारचे विरजधारतीर्थ येथील श्रध्दा स्नान पुरातत्व विभागाने बेकायदेशीरपणे बंद केल्याच्या विरोधात डॉ.बच्छिरे यांनी सविनय कायदेभंग करून स्नानास असलेले बंदीचे बोर्ड हटविला. त्या विरोधात पुरातत्व विभागाने डॉ. बच्छिरे यांच्यावर १८७,१८८,४४७,१३५.कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला. याच्या विरोधात लोणार धारतीर्थच्या समोर एक दिवसीय आत्मक्लेष आंदोलन करून लाक्षणिक उपोषण करण्यात आले. धार तीर्थावर महाराष्ट्रतून नव्हे तर देशातून श्रद्धाळू येतात, या श्रद्धाळू,पर्यटकांच्या येण्यामुळे आमच्या लोणार नगरीचा व्यापार उद्योग चांगल्या स्थितीत चालत होते. येथे श्रद्धाळू व पर्यटक येणे बंद झाले आहे. त्यामुळे लोणारची अर्थव्यवस्था डबघाईला गेली आहे, करिता शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर, बुलढाणा जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, बुलढाणा जिल्हा उपप्रमुख प्रा.आशीषभाऊ रहाटे यांच्या नेतृत्वात डॉ.बछिरे यांनी सविनय कायदेभंग करून धारातीर्थ स्वतंत्र केले. त्यावर पुरातत्त्व विभागाने खोटे गुन्हे नोंदवून केलेल्या कारवाईच्या विरोधात एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करून आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना (ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख अॅड दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव सर यांनी केले. या प्रसंगी मेहकर शहर प्रमुख किशोर गारोळे, आकाश घोडे, परमेश्वर दहातोंडे, विजय मोरे, डॉ.राजू मोरे, श्याम राऊत, कैलास अंभोरे, जीवन घायाळ, तानाजी मापारी, योगेश भुक्कान, किसन आघाव, राजू बुधवत, लुकमान कुरेशी, तानाजी अंभोरे, उमर सैय्यद, श्रीकांत मादनकर, इकबाल कुरेशी, गोपाल मापारी, राजू दहातोंडे, विनोद मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.