BuldanaBULDHANAHead linesVidharbha

वीरजवान अक्षय गवते यांच्यावर सोमवारी पिंपळगाव सराई येथे अंत्यसंस्कार

चिखली (तालुका प्रतिनिधी) – पिंपळगाव सराई येथील वीर जवान अक्षय लक्ष्मण गवते (वय २०) यांना सियाचीनमधील सियाचीन ग्लेशीअरमध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण आले. २० ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी रुग्णालयात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अक्षय यांच्यावर सोमवारी, २३ ऑक्टोबरला सकाळी जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे. ३० डिसेंबर २०२२ रोजी अक्षय ‘अग्नीवीर’ म्हणून सैन्यात भरती झाले होते.
भारतीय सैन्यदलामध्ये टेलिफोन ऑपरेटर म्हणून अक्षय लक्ष्मण गवते हे ३० डिसेंबर २०२२ मध्ये रुजू झाले होते. पहिल्या कर्तव्यालाच त्यांना सियाचीनसारखे ठिकाण मिळाले होते. दरम्यान, २० ऑक्टोबर रोजी रात्री त्यांना अचानक त्रास झाल्याने त्वरित ४०३ फिल्ड रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. त्यांचे पार्थिव जम्मू काश्मिरमधून दिल्ली येथे २२ ऑक्टोबररोजी सकाळी पोहोचले. तेथून दुपारी औरंगाबादला आणण्यात आले. सोमवारी सकाळी पार्थिव छत्रपती संभाजीनगरवरून पिंपळगाव सराई येथे आणण्यात येईल. त्यांच्या मूळगावी पिंपळगाव सराई येथे पार्थिव आणण्यात येऊन तेथे त्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सुत्रांनी स्पष्ट केले. मृत जवान अक्षय हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याचे आई-वडील हे शेती करतात. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच पिंपळगाव सराईमध्ये शोककळा पसरली आहे.

आई-वडिलांनी एकलुताएक मुलगा देशाला दिला!

आई-वडिलांना एकुलता एक देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणार्‍या अक्षय यांचे शिक्षण पिंपळगाव सराई येथील जनता विद्यालयात झाले. सैनिक भरतीची तयारी करीत असताना गेल्यावर्षी त्यांची अग्नीवीरमध्ये भरती झाली. अक्षय आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अक्षय यांना एक लहान बहीण, अक्षय यांचे आईवडील शेती करतात.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!