Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsPuneWorld update

जरांगे पाटलांच्या मागण्यांना शरद पवारांचा पाठिंबा!

– त्यांचाच पक्ष त्यांना तिकीट द्यायला नाकरतो, ही बावनकुळेंची लायकी : पवारांनी साधला निशाणा

बारामती (विशेष राजकीय प्रतिनिधी) – मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला दिलेली मुदत संपायला दोन दिवस आहेत. त्यामुळे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात कोणता निर्णय घेते, याकडे आमचे लक्ष आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर आम्हाला आनंदच होईल, अशी भूमिका रविवारी (दि.२२) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मांडली. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. तसेच, पवार व ठाकरे यांच्यावर टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्याच पक्षाने मागीलवेळी तिकीट नाकारले होते, त्यामुळे या गृहस्थाचे पक्षातील स्थान काय आहे, हे कळून चुकेल. ज्यांना पक्षातच किंमत नाही, त्यांच्यावर मी काय बोलावे, अशा एका शब्दांत पवारांनी बावनकुळेंच्या टीकेचा मुद्दा उडवून लावला.
शरद पवार म्हणाले, की राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सुसंवाद झाल्याचे दिसते आहे. सरकार यामध्ये काय करतंय याकडे आमचेही लक्ष आहे. दोन दिवसांत सरकारची भूमिका स्पष्ट होईल. यातून काही मार्ग निघाला तर चांगले आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत. त्यांच्या मागण्यांमध्ये हस्तक्षेप करणे योग्य नाही, असेही पवारांनी सांगितले.
कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केल्यानंतर भाजपने राज्यभर आंदोलन केले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट व काँग्रेसवर टीका केली होती. यावर पवारांना विचारले असता ते म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांचे जनमानसात आणि पक्षात काय स्थान आहे, मला माहित नाही. बावनकुळे हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकी वेळी त्यांच्याच पक्षाने त्यांना तिकीट दिले नव्हते. तिकीट द्यायलासुद्धा लायक नाही, असा त्यांचा स्वतःचा पक्ष या व्यक्तीच्याबद्दल बोलतो. त्यावर आपण काय भाष्य करायचे, असे म्हणत त्यांनी बावनकुळे यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला.

आंबेडकर इंडिया आघाडीत आले तर स्वागतच – शरद पवार

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच्या बैठकीबाबतही शरद पवार यांनी माहिती दिली. इंडिया आघाडीत जे लोक सहभागी होतील याचा आम्हाला आनंदच आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांसोबतची कालची भेट त्यासाठी नव्हती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या एका ग्रंथाला १०० पूर्ण झाली आहेत. यासंबंधीच्या कार्यक्रमासाठी आम्ही एकत्र आलो होतो, असे पवारांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!