आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील माऊली नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्था, संत सावता महाराज वारकरी शिक्षण संस्था, श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था या शालेय शिक्षणा समवेत वारकरी सांप्रदायिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत शिक्षण घेत असलेल्या वारकरी विध्यार्थी साधकांची शासनाचे मार्गदर्शक सूचनां प्रमाणे मोफत मोफत आरोग्य व नेत्र तपासणी श्री आळंदी धाम सेवा समिती व आळंदी शहर शिवसेना यांचे वतीने आयोजन करण्यात आले. या मोफत आरोग्य व नेत्र तपासणीस शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात १५० वर साधकांनी सहभाग घेत शिबीर यशस्वी केले.
यावेळी माऊली नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्थाचे प्रमुख संदीप महाराज नगरे, विक्रम महाराज जाधव, पांडुरंग महाराज घाटोळ, भागवत महाराज सांगळे, संत सावता महाराज वारकरी शिक्षण संस्थाचे ज्ञानेश्वर महाराज गवळी, श्री आळंदी धाम सेवा समिती अध्यक्ष व शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण, विश्वस्त नितीन ननवरे, अर्जुन मेदनकर, एम डी पाखरे,अनिल जोगदंड, माऊली महाराज घुंडरे, संतोष राठोड, श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था विश्वस्त सचिन शिंदे, चव्हाण हॉस्पिटलचे डॉ. योगेश चव्हाण, अमृत लॅब , सूर्या ऑप्टिकल डॉ. खुशांत त्रिवेदी आदी उपस्थित होते. यावेळी गरजू आवश्यक मुलांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. सर्व मुलांची रक्त गट तपासणी व आरोग्य तपासणी करण्यात आले. या उपक्रमाचे सेवाभावी संस्था तर्फे कौतुक करण्यात आले.