आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : लोहगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना, अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनीरिंग व ससून हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अभियंता दिनाचे औचित्य साधून अजिंक्य डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन उत्साहात करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील २३२ विद्यार्थ्यांनी रक्तदान केल्याची माहिती अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ एकनाथ खेडकर यांनी दिली.
यावेळी संस्थेचे सल्लागार डॉ सुशांत पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अभियंता दिना निमित्त आयोजित केलेल्या नावीन्यपूर्वक उपक्रमा बद्दल रा से यो स्वायंसेवकांचे विशेष कौतुक केले. अजिंक्य डी वाय टेकनिकल कॅम्पुस च्या संचालिका डॉ कमलजीत कौर व अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनीरिंग चे प्राचार्य डॉ फारूक सय्यद यांनी रा से यो स्वयंसेवकांना रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी मार्गदर्शन केले. भविष्यातही असेच समाजोपयोगी उपक्रम करण्यास प्रोत्साहित केले. रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे रा से यो कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक दिलीप बाळासाहेब घुले, ससून हॉस्पिटल रक्तपेढीचे अधीक्षक शरद देसले, अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनीरिंग च्या सर्व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालया मधील २३२ विद्यार्थ्यांनी रक्तदान करून शिबिरात सहभाग घेतला. या सर्वांचे कौतुक करून सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.