आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दर्शनास आषाढी एकादशीदिनी भाविकांनी श्रीचे दर्शनास हरीनाम गजर करीत गर्दी केली. परिसरातून आलेल्या भाविकांनी श्रींचे संजीवन समाधीचे दर्शन घेवून नगर प्रदक्षिणा पूर्ण केली. परंपरेने श्रींचे पालखीची ग्रामप्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली.
आळंदी मंदिरातील प्रथा परंपरेचे पालन करीत एकादशी दिनी पहाटे ११ ब्रम्हवृंदांचे हस्ते श्रीची पूजा, आरती, दुधारती झाली. एकादशी दिनी श्रींना फराळाचा महानैवेद्य झाला. या प्रसंगी मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली होती. श्रींचे पालखीचे नागरप्रदक्षिणे दरम्यान भाविकांनी दुतर्फ़ा गर्दी करून दर्शन घेतले. हजेरी मारुती मंदिरात परंपरेने हरिपाठावर आधारित कीर्तन सेवा चंद्रहंस चक्रांकित यांची कीर्तन सेवा झाली. या प्रसंगी मानकरी मंगेश सुरू, साईल कुऱ्हाडे, सेवक सौरभ चौधरी, पभाऊसाहेब शेंडे, महादू वीर, श्रीहरी चक्रांकित, नरहरी महाराज ढाकणे, सुधीर कुऱ्हाडे, शिवाजीराजे भोसले यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.
मंदिरातील दर्शन बारीत राम वाड्या समोरून रांगा लावून भाविकांनी दर्शनास गर्दी करीत श्रीचे समाधी दर्शन घेतले. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात नित्य नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाल्याचे भाऊसाहेब शेंडे यांनी सांगितले. भाविकांच्या दर्शनासाठी प्रभावी नियोजन केले. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन देण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले होते. भाविकांनी आळंदी मंदिरात रांगा लावून श्रीचे दर्शन घेतले. आळंदी पोलिस, मंदिरा तील सुरक्षा रक्षक, सेवक-पोलिस यांनी बंदोबस्त ठेवला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे आदीनी परिश्रम घेतले. वारकरी यांना फराळाचे वाटप करण्यात आले. आळंदी संस्थांनच्या वतीने पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
एकादशी निमित्त आलेल्या भाविक-वारकरी यांनी येथील मंदिर आणि नगर प्रदक्षिणा हरीनाम गजरात केली. येथील मंदिर परिसरात थेट दुचाकी वाहने येत असल्याने भाविकांना मंदिर परिसरात ये-जा करताना काहीशी गैरसोय झाली. प्रदक्षिणा मार्गावरून श्रींचे पालखीची हरिनाम गजरात नगर प्रदक्षिणा झाली. भाविकांची अनवाणी पायाने होणारी नगरप्रदक्षिणा प्रशस्त नगरप्रदक्षिणा मार्ग विकसित झाल्याने सुखकर झाली. एकादशी निमित्त आलेल्या भाविकांच्या वाहनांमुळे परिसरातील रस्ते वाहनांच्या गर्दीने भरले होते. पुलांवर वाहनांची गर्दी तसेच नदीवर पुराचे पाणी पाहण्यास भाविक, नागरिकांची गर्दी होती.
हरिपाठ कीर्तनसेवेस उत्साही प्रतिसाद
ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साही वातावरणात साजरी झाली.माउली मंदिरातील प्रथा परंपरेचे पालन करीत हरिपाठ कीर्तन सेवेस भाविकांनी गर्दी केली.श्रींचे पालखीचे आषाढीस पंढरपूरला जाण्यास प्रस्थान झाल्यानंतर ते श्रींची पालखी आळंदीत परत येई पर्यंत येथील विष्णुबुवा चक्रांकित महाराज यांचे परिवाराचे वतीने कीर्तन सेवेची परंपरा आहे. श्रींचे विना मंडपात हरिपाठावर आधारित माउली मंदिरात कीर्तन सेवा परंपरा आहे. एकादशी दिनी हजेरी मारुती मंदिरात देखील त्यांचे वतीने कीर्तनसेवा झाली. हजेरी मारुती मंदिरात नगरप्रदक्षिणे दरम्यान श्रींचे वैभवी पालखीचे दर्शनास भाविकांची गर्दी झाली. दरम्यान प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी श्रींचे पालखीचे दर्शन घेतले. श्रींचे पालखीचे मंदिरात नगरप्रदक्षणे नंतर आगमन झाले. यावेळी मानक-याना देवस्थान तर्फे नारळ प्रसाद देण्यात आला.