बुलडाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र) प्रेम प्रकरणामध्ये प्रियकराच्या वडिलांचा हस्तक्षेप होत असल्याने हा अडथळा दूर करण्यासाठी त्यांचा निर्घून खून करण्यात आल्याची घटना पुरभे ले आऊट बुलडाणा येथे उघडकीस आली. दिनेश आराख वय ४२ असे मृतकाचे नाव आहे. प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना शिताफीने अटक केली आहे.
९ जुलै रोजी सुंदरखेड परिसरातील पूर्भे-ले-आउट चर्च जवळ एका इसमाला मारहाण करून गंभीर जखमी करून टाकून दिले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून सदर व्यक्तीस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. परंतु गंभीर दुखापत झाल्याने त्याचा रात्री २ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. सदर मृतक व्यक्ती दिनेश आराख रा.सागवन परिसर असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली. यामध्ये पोलिसांनी आरोपी सागर बबन मगरे, लिलाबाई गणेश सरोजकर यांना अटक केली आहे. २०२० मध्ये याच महिलेने आपल्या नवऱ्याच्या निर्घुन खुन करून शेतात नेऊन पुरले होते. याप्रकरणी ३०२ चा गुन्हा दाखल असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. मारहाणीतून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संदर्भात देखील या महिलेचा सहभाग असल्याचे समजते.
याप्रकरणी फिर्यादी शुभम दत्तू हिवाळे वय वर्षे २४ राहणार हाजी मलंग दर्गा जवळ विश्वास नगर बुलढाणा यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अपराक्रम अ.प.क्र. ५३७ कलम ३०२ १२० ब ३४ भा.द.वि नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक दिलीप पवार, सुनील जाधव, पोलीस नाईक, गंगेश्वर पिंपळे, सुनिता खंडारे व डी.बी.पथक अधिकारी व कर्मचारयांनी यांनी तपासात सहभाग घेतला.