आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत या वर्षी श्रावणातील दुसऱ्या सोमवारी ( दि. २८ ) भाविकांच्या गर्दीने माऊली मंदिर परिसर गजबजून गेला होता. भाविकांनी श्रींचे दर्शन रांगा लावून घेतले. श्रींचे दर्शनास परिसरासह भाविकांनी गर्दी केली होती. श्रावणातील सोमवार दिनी श्री आळंदी धाम सेवा समितीचेवतीने अध्यक्ष युवा उद्योजक राहुल चव्हाण यांचे हस्ते भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
आळंदीतील पुरातन श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात तसेच श्रींचे संजीवन समाधी दर्शनास मोठी गर्दी झाली होती. मंदिरातील परंपरेचे पालन करीत दैनंदिन कार्यक्रम झाल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. यावेळी उपव्यवस्थापक तुकाराम माने, सुरक्षा रक्षक, सेवक, पुजारी यांनी भाविकांना कमी वेळेत दर्शन देण्याची सुलभ व्यवस्था केली.
मंदिरात भाविकांना महाप्रसाद वाटप
आळंदी येथील श्री आळंदी धाम सेवा समिती अध्यक्ष युवा उद्योजक राहुल चव्हाण यांच्यावतीने श्रावणी सोमवारनिमित्त आळंदी माऊली मंदिरात भाविकांना केळी फळ महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आळंदी मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त पुरातन श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली होती. भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. यावेळी आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, महादेव पाखरे, अविनाश राळे, साईनाथ ताम्हाणे, सचिन शिंदे, नंदकुमार वडगावकर, अनिल जोगदंड, सुनील बटवाल आदी उपस्थित होते.