– ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध ६० प्रकारची पदे मिळून १०,९४९ जागा भरणार!
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – राज्य शासनाच्यावतीने लवकरच ११ हजार पदांची भरती केली जाणार आहे. विशेषत: गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील या भरतीची जाहिरात उद्या म्हणजे मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ही माहिती दिली.
आरोग्य विभागात कमी मनुष्यबळ असल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचार्यांवर कामाचा मोठा ताण येत होता. त्यामुळे सातत्याने याबाबतच्या तक्रारी येत होत्या. सरकार आणि आरोग्य विभाग लवकरच यावर तोडगा काढेल, अशी चर्चा होती. अखेर आरोग्य विभागाने या प्रकरणी महत्त्वाचे पाऊल उचलत आरोग्य विभागात बंपर भरतीचा निर्णय घेतला आहे. ११ हजार पदांसाठी उद्या आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. आरोग्य विभागात वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीत अधिकार्यांचीदेखील निवड होणार आहे. तसेच कर्मचारी वर्गासाठीदेखील ही भरती महत्त्वाची ठरणार आहे. यापूर्वी २०२१ साली आरोग्य विभागात राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेवेळी पेपरफुटीचा प्रकार झाला होता. त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने आणि पाठपुराव्यानंतर आरोग्य विभागातील मेगा भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागात नोकरीच्या शोधात असलेल्यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे. आता होणार्या भरती प्रक्रियेत ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध ६० प्रकारची पदे मिळून एकूण १० हजार ९४९ पदांची केली जाणार आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसमार्फत राबवली जाणार आहे, अशीदेखील माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली.
उद्या सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात होईल प्रसिद्ध!
आरोग्य विभागातील ११ हजार पदांसाठी उद्या आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. आरोग्य विभागात वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीत अधिकार्यांचीदेखील निवड होणार आहे. तसेच कर्मचारी वर्गासाठीदेखील ही भरती महत्त्वाची ठरणार आहे. आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी होणारी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे. गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे.