चिखली (विशेष प्रतिनिधी) – सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी समर्थित असलेल्या राष्ट्रीय लोक मंचच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी वसंतराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. वसंतराव हे मूळचे चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील रहिवासी असून, सद्या ते जालना येथे स्थायीक झालेले आहेत.
मराठवाड्यातील जालना येथील रहिवासी वसंतराव देशमुख हे मागील अनेक वर्षापासून विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक चळवळीमध्ये काम करत आहेत. त्यांनी आपल्या कर्तृत्वातून समाजामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवत, सेवा व समर्पणाची भावना जोपासली आहे. त्यामुळे भाजपसमर्थक राष्ट्रीय लोक मंचच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, ब्रिक्स व्हुमन राईट मानव अधिकार मिशन या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्हाध्यक्ष पदावर काम करत असतानाच प्रशासकीय पातळीवर सर्वसामान्य नागरिकांची होत असलेले पिळवणूक आणि अनेक माध्यमातून होत असलेला भ्रष्टाचार यांना वाचा फोडून वसंतराव देशमुख यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले होते. भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांची भूमिका नेहमीच आक्रमक राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन दीपक श्रीवास्तव राष्ट्रीय संघटन महामंत्री यांनी वसंतराव देशमुख यांची भाजप समर्थक राष्ट्रीय लोक मंच मराठवाडा विभागीय अध्यक्ष या पदावर निवड करून त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडीबद्दल सामाजिक, राजकीय चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच, मिसाळवाडी, शेळगाव आटोळ परिसरातूनही त्यांचे अभिनंदन होत आहे.
—–