आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : क्रांतिवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची ११५ वी जयंती विविध सेवा भावी संस्थांचे वतीने विविध उपक्रमातुन देशभक्तिमय वातावरणात साजरी झाली. आळंदीतून श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील शालेय मुलांची फेरी रॅलीचे माध्यमातून झाली. हुतात्मा राजगुरू यांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाट्य प्रयोग मुख्याध्यापक रविंद्र चौधरी यांनी सादर केला. राज्यगीत, पसायदान गायन असे विविध कार्यक्रम झाले. यावेळी युवा उद्योजक राहुल चव्हाण, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, आनंदराव मुंगसे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, भाजी मंडई अध्यक्ष मल्हार काळे, संयोजक सुलतान शेख, सय्यद निसार, सौरभ गव्हाणे, यावेळी आळंदी ग्रामस्थ, श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
हुतात्मा राजगुरू यांचा जन्म २४ ऑगस्ट १९०८ ला खेड ( राजगुरुनगर ) येथे भीमा किनाऱ्या लगतचे वाड्यात झाला. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे ११५ व्या जयंती निमित्त त्यांचे जन्म स्थळ स्मारकास भेट देऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी आळंदीतून हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ अध्यक्ष अर्जुन मेदनकर, स्मारक समिती संजय घुंडरे, श्रीकांत घुंडरे, युवा उद्योजक माऊली धाम सेवा समिती अध्यक्ष राहुल चव्हाण, उपाध्यक्ष महादेव पाखरे, निमंत्रक अविनाश राळे आदी उपस्थित होते. आळंदी येथील शासकीय विश्रामगृहात क्रांतिवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची जयंती त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण करून जयंती साजरी केली. हुतात्मा राजगुरू सर्व मजूर संघाच्या वतीने हुतात्मा राजगुरू यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आळंदीत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, आनंदराव मुंगसे, सागर भोसले, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, सुलतान शेख, उद्योजक राहुल चव्हाण, अरुण घुंडरे, निसार सय्यद, सौरभ गव्हाणे, आळंदी जनहित आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, महादेव पाखरे, अनिल जोगदंड, मल्हार काळे, अविनाश राळे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, दिनेश कुऱ्हाडे यांचेसह श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.