उदयनगर, ता. चिखली (प्रतिनिधी) – येथील शिक्षण क्षेत्रात सदा अग्रेसर असणार्या श्री शिवाजी विद्यालयात २२ ऑगस्ट रोजी मानव विकास मिशन योजनेअंतर्गत ७८ सायकलींचे वाटप विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.ए.बोडखे व उपमुख्याध्यापक आर.एम.भुजे व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्याहस्ते विद्यार्थिनींना करण्यात आले.
उदयनगर येथील श्री शिवाजी विद्यालयात परिसरातील गावातील विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने शिक्षण घेण्यासाठी उदयनगर येथे येत आहेत. परिणामी, घरची परिस्थिती बिकट असल्याने व वेळेवर बस मिळत नसल्याने बरेचश्या विद्यार्थिनींना शाळेत पायी प्रवास करावा लागतो. तेव्हा शासनाच्या मानव विकास मिशन योजनेअंतर्गत श्री शिवाजी विद्यालयात मुलींना ७८ सायकल मुख्याध्यापक बोडखे सर, उपमुख्याध्यापक, भुजे सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. आम्हाला आज खूप चांगला वाटतंय…. आमच्या नवीन सायकली खूप छान आहेत. शाळा दूर असली तरी आता चिंता नाही. आता आम्हाला पायी शाळेत येण्याची गरज नाही. नवी कोरी लाल, गुलाबी रंगाची सायकल हातात धरून मोठ्या आनंदात समोर उभ्या असलेल्या त्या विद्यार्थिनी बोलत होत्या. सोबतच मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी लाभार्थी विद्यार्थिनी यांनी संस्थेचे अध्यक्ष सुदेश लोंढे व मानव विकास मिशन योजनेअंतर्गत कार्य करणारे अधिकारी व पदाधिकारी यांचे आभार मानले. यावेळी मुख्याध्यापक बोडखे सर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित सर्व मुला-मुलींना व पालक वर्गांना मार्गदर्शन केले.