बिबी (प्रतिनिधी) – स्थानिक ग्रामपंचायतीच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी १३ ऑगस्ट रोजी साजरी करण्यात आली.
यावेळी सरपंच चंदाबाई गुलमोहर, ग्रामसेवक फुपाटे साहेब, उपसरपंच भास्कर खुळे, ग्रामपंचायत सदस्य अमोल मुळे, गजानन काकडे, विठ्ठल देवकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विठ्ठल आटोळे, उपाध्यक्ष शेख रियाज, श्रीधर आटोळे, अशोक आटोळे, सुनील इंगळे व गावातील युवक कैलास मोरे, चेतन बनकर, रमेश आंधळे, संदीप खुळे, आनंद आटोळे, श्रीमत आटोळे, कृष्णा पंधे व इतर गावातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारीवर्ग व महिला वर्ग प्रमुख्याने उपस्थित होते. यावेळी सरपंच चंदाबाई गुलमोहर यांनी देवी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित असलेल्या व्यक्तींनी अभिवादन केले व सरपंचपुत्र दीपक गुलमोहर यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायतचे शिपाई किशोर राठोड यांनी केले.