आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील राठी पोलीबॉन्ड प्रा.ली. चे प्रमुख सामाजिक बांधिलकी जपणारे ज्येष्ठ उद्योजक मधुभाऊ राठी यांच्या ८३ व्या वाढदिवसा निमित्त कंपनीत व्यव्थापन, कामगार यांनी सामाजिक बांधिलकीतून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्साही प्रतिसाद देत १०१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
यावेळी इंनलक्स बुधाराणी हॉस्पिटल पुणे यांचे रक्तपेढीचे माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले. कंपनीचे उपाध्यक्ष मयुरेश कुलकर्णी, बी.पी. कुमार दंडापाणी, जनरल मॅनेजर महेंद्र फणसे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले. यावेळी युवा उद्योजक राहुल चव्हाण, उद्योजक गांधीले,आळंदी फाउंडेशन अध्यक्ष मेदनकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर, नेचर फाउंडेशन अध्यक्ष भागवत काटकर, ह. भ.प. ओमकार महाराज वैद्य यांचे सह कामगार रक्तदाते उपस्थित होते. यावेळी ग्रोमोस केमिकल प्रायव्हेट लिमिटेडचे एच. आर. मॅनेजर सुशांत कुमार यांनी ही रक्तदान शिबिरात सहभागी होत सामाजिक बांधिलकी जातं केली.
सुमारे शंभरावर रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपणारे उद्योजक मधूभाऊ राठी यांचा वाढदिवस अनावश्यक खर्चाला फाटा देत रुग्णाचे आरोग्य सेवेसाठी रक्तदानाने वाढदिवस साजरा करीत इतरां पुढे आदर्श निर्माण केला. यास परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाला. मॅनेजींग डायरेक्टर आदित राठी यांचे मार्गदर्शन खाली रक्तदान शिबिराचे आयोजन उत्साहात करण्यात आले. यासाठी महिंद्र फणसे यांनी महेंद्र फणसे यांनी तसेच कामगार व्यवस्थापन यांनी परिश्रम घेतले. कंपनीतील कामगार, व्यवस्थापनातील कर्मचारी, अधिकारी यांनी सहभागी होत शिबीर यशस्वी केले.