बुलढाणा (खास प्रतिनिधी) – शाळकरी मुलांसाठी एसटी बस सूरू करावी. स्वस्त धान्य दुकानदारांकडून नियमीत अन्नधान्य वाटप करण्यासाठी आझाद हिंद महिला संघटनेच्या वतीने धरणे निदर्शने करीत जिल्हा पुरवठा अधिकारी तथा विभाग नियंत्रक रापम यांना निवेदन सादर करण्यात आले.
मोताळा,नांदुरा, खामगाव तालुक्यांअतर्गत येणारे ग्राम तरवाडी, कंडारी, बोरजावळा,मूरंबा, निपाणा,पि. राजा, ज्ञानगंगापूर,वडती,वसाडी, धानोरा,यासह प्रमुख गावातील मुली व विद्यार्थ्यांसाठी एसटी बसेस सुरू करण्यात यावी. नमूद गावातील स्वस्त धान्य दुकानातील धान्य पुरवठा नियमित सुरळीत करण्यात यावा. तर 2014 पासून ग्राम कंडारी येथील स्वस्त धान्य दुकानदाराने असंख्य नागरिकांना धान्य वाटप करतांना केलेल्या गैरव्यव्हाराची चौकशी करून कारवाई करन्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनासोबत ग्रामपंचायत ने घेतलेला ठराव. ग्रामपंचायतचे मागणी पत्र,जिल्हा परिषद सदस्यांचे मागणी पत्र.यापूर्वी दिलेले निवेदनांची प्रत, शालेय विद्यार्थ्यांची यादी सहपत्र म्हणून सोबत जोडली आहे. तर यापूर्वी सदर ग्रामीण भागातील नागरिकांनी एसटी बस सुरू करण्यासाठी रास्ता रोको सूद्धा केलेला आहे. तर आठ दिवसात मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा निवेदनाअंती देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी आझाद हिंद महिला संघटनेच्या प्रदेश संपर्कप्रमुख सुरेखाताई निकाळजे, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष असलम शाह, तालुकाध्यक्ष प्रमिलाबाई सूशीर, प्रसिद्धीप्रमुख आशा गायकवाड, सर्वश्री शाखाध्यक्ष लक्ष्मी भाकरे, मुक्ता भाकरे,शारदा भातोकार,वर्षा भाकरे, योगिता आटकर, गीता सुरडकर, दिपाली मेतकर, अर्चना शिरसागर, माधुरी कडाळे, जिजाबाई इंगळे, गोविंदा हेलोडे, दिलीप मेतकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. निवेदनावर बहुसंख्या नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.