नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा, तळोदा आणि शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुतांश रस्ते खराब झाले असून त्यांची दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. पावसाळ्या पूर्वीच या रस्त्यांची दुरवस्था झाली होती. मात्र संबंधित यंत्रणेकडे वारंवार तक्रारी करूनही रस्त्यांची दुरुस्ती केली गेली नाही.
पावसाळ्यात या रस्त्यांची अजूनही दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन धारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागातील जिल्हा मार्ग आणि इतर रस्त्यांची जिल्हा परिषदेने दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. तर काही रस्त्यांसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्यात जबाबदारी वरून खो वर खो असल्याचे दिसून येत आहे. मात्र याच्या त्रास देखील सामान्य प्रवाशांना साेसावा लागत आहे.