ओबीसी आरक्षणाशिवाय ९२ नगरपालिका, ४ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर!
– पाऊस नसेल तर १८ ऑगस्टला मतदान, १९ ऑगस्टला निकाल
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राज्यात इतर मागासवर्गीय आरक्षणाशिवाय (ओबीसी) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल राज्य निवडणूक आयोगाने फुंकला आहे. तब्बल ९२ नगरपरिषदा व चार नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज जाहीर केला. पाऊस कमी राहिल्यास १८ ऑगस्टला मतदान होणार असून, लगेचच दुसर्या दिवशी म्हणजे १९ ऑगस्टला निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आजपासून या ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्याप सुटलेला नाही. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने पाऊस-पाण्याचे नियोजन पाहून आठ-पंधरा दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाला दिल्या होत्या. याबाबतचा न्यायालयाचा निर्णय १७ मे रोजी आला होता. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायचीच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुका ऑगस्ट महिन्यात होणार असल्याने भरपावसात या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
जिल्हाधिकारी कार्यक्रम जाहीर करणार : २० जुलै
उमेदवारी अर्ज उपलब्ध : २२ ते २८ जुलै
अर्ज स्वीकारण्याचा कालावधी : २२ ते २८ जुलै
अर्जाची छाननी : २९ जुलै
अर्ज मागे घेण्याची मुदत : ४ ऑगस्ट दुपारी ३ पर्यंत
उमदेवारी अर्जावरील आक्षेप : ८ ऑगस्ट
मतदानाचा दिनांक : १८ ऑगस्ट
मतमोजणी आणि निकाल : १९ ऑगस्ट
जिल्हानिहाय नगरपालिकांची यादी
(अ वर्ग नगरपालिका)
पुणे : बारामती
सोलापूर : बार्शी
जालना : जालना
बीड : बीड
उस्मानाबाद : उस्मानाबाद
जळगाव : भुसावळ
(ब वर्ग नगरपालिका)
नाशिक : मनमाड, सिन्नर, येवला
धुळे : दोंडाईचा बरवाडे, शिरपूर वरवाडे
नंदूरबार : शहादा
जळगाव : अमळनेर, चाळीसगाव
अहमदनगर : संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर
पुणे : चाकण, दौंड
सातारा : कराड, फलटण
सागंली : इस्लामपूर, विटा
सोलापूर : अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज
कोल्हापूर : जयसिंगपूर
औरंगाबाद : कन्नड पैठण
बीड : अंबेजोगाई, माजलगाव, परळी-वैजनाथ
लातूर : अहमदपूर
अमरावती : अंजनगाव सूर्जी
(क वर्ग नगरपालिका)
नाशिक : चांदवड, नांदगाव, सटाणा, भगूर
जळगाव : वरणगांव, धरणगाव, एंरणडोल, फैजपूर, पारोळा, यावस
अहमदनगर : जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहता, राहुरी,
पुणे : राजगुरुनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड, शिरुर
सातारा : म्हसवड, रहितमपूर, वाई
सांगली : आष्टा, तासगाव, पलूस,
सोलापूर : मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डूवाडी, मंदगी, मंगळवेढा, सांगोला
कोल्हापूर : गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड, वडगाव
औरंगाबाद : गंगापूर, खुलताबाद
जालना : अंबड, भोकरदन, परतूर
बीड : गेवराई, किल्ले धारुर
उस्मानाबाद : भूम, कळंब, मुरुम, नळदूर्ग, उमरगा, परंडा, तुळजापूर
लातूर : औसा, निलंगा,
अमरावती : दर्यापूर
बुलडाणा : देऊळगाव राजा
नगरपंचायत निवडणूक
अहमदनगर : नेवासा
पुणे : मंचर, माळेगाव बुद्रुक
सोलापूर : अनगर
——————-