AalandiPachhim Maharashtra

आळंदीत ‘एक सही संतापाची’ मनसे स्वाक्षरी अभियानास प्रतिसाद

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : महाराष्ट्रात सुरू असलेल्या गल्लीच्या राजकारणाचा मतदारांत संताप व्यक्त करता यावा यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशा नुसार महाराष्ट्र भरात एक सही संतापाची हि मोहीम आळंदी शहर मनसे यांचे वतीने राबवण्यात आली आहे, आळंदी मध्ये या एक सही संतापाची या मोहिमेस परिसरातील नागरिक, भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला. अशी माहिती शहराध्यक्ष अजय तापकीर यांनी दिली.

या प्रसंगी सही करून सुरू असलेल्या गल्लीचे राजकारणाचा निषेध व्यक्त करीत सुरु असलेल्या राजकीय स्थितीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. एक सही संतापाची या मोहिमेत महाराष्ट्र सैनिक, पद अधिकारी, शेतकरी, व्यापारी, तरुण, विद्यार्थी समाजातील प्रत्येक घटक उपस्थित राहून संताप व्यक्त करीत असताना दिसला. या प्रसंगी मनसेचे पदाधिकारी मनविसेचे आळंदी अध्यक्ष मंगेश काळे, वैभव काळे, अभिजित गुंड, ऋषी सानप, तेजस नागरगोजे, सुधाम पारधी, भरत दांगट, सौरभ वाकचौरे , योगेश मोरे, राहुल गायकवाड, ललित राणे, ज्ञानेश्वर वाढेकर , नामदेव भोसले आदी उपस्थित होते. यासाठी शहराध्यक्ष अजय तापकीर यांनी परिश्रम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!