चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील अंत्री कोळी येथे आज (दि.२) रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत जिल्हा परिषद शाळेमध्ये महाआरोग्य तपासणी शिबिर पार पडले. गणेश राजपूत मित्रमंडळाच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. चिखली येथील नामवंत डॉक्टरांनी या शिबिरात आपली सेवा दिली. बहुसंख्य गोरगरीब रूग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी गणेश राजपूत तसेच त्यांचे मित्रमंडळ, गावातील नागरिक उपस्थित होते. सर्वप्रथम आलेल्या सर्व डॉक्टरांचे गणेश राजपूत, समाधान मोरे, समाधान हिवाळे, योगेश डुकरे, ऋषिकेश डुकरे, महेंद्र हिवाळे यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. गणेश राजपूत यांना समाजकार्याची आवड आहे. सरपंच सुभाष ठेंग यांनीही शिबिराचा लाभ घेतला, व गणेश राजपूत यांना समाजकार्य करण्यासाठी व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर महाआरोग्य तपासणीला सुरूवात करण्यात आली. यावेळी परिसरातील नामवंत डॉ.प्रशांत चिंचोले, चिंचोले हॉस्पिटल, चिखली, डॉ. सागर चिंचोले, चिंचोले अॅक्सिडेंट हॉस्पिटल, चिखली, डॉ. सागर राजपूत, राजपूत दातांचा दवाखाना, चिखली, डॉ. प्रतिक महाजन, जवंजाळ हॉस्पिटल, चिखली यांनी रुग्णाना मोफत तपासणी करुन मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी चारही हॉस्पीटलकडून रुग्णांची तपासणी झाली. वाघापूर-अंत्री कोळी येथील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिराचे आयोजन गणेश राजपूत तसेच अंत्री कोळी-वाघापूर मित्रमंडळ यांच्यावतीने करण्यात् आले होते.