Uncategorized

फुटीर गटाचे आता दोन आठवड्यानंतर “राऊतायन”; कुणी लिहिली ही “एक समान कार्यक्रम”ची स्क्रिप्ट?

 राज्याबाहेर पळून गेलेले फुटीर राज्याबाहेर तोंडाला झिप लावून गप्प होते. कडेकोड बंदोबस्तात, निगराणीत फुटिरांना एकत्र कोंडून ठेवले जात होते. आता मात्र सर्व फुटीर “एक समान कार्यक्रम”च्या स्क्रिप्टनुसार बोलू लागले आहेत. फुटीर पळून गेल्यानंतर राज्यभर या फुटिरतेविरुद्ध तीव्र संतापाची भावना, गद्दार म्हणून निर्भत्सना, सोशल मीडियातून सर्वसामान्य जनतेचे मिळणारे शिव्या-शाप यामुळे सर्वच फुटीर हादरले आहेत. याचे खापर तर कुणावर तरी फोडायला हवे, म्हणून मग आधी राष्ट्रवादी, निधीच्या नावे शिमगा केला गेला; पण सभागृहात अजित पवार यांनी कुणी किती निधी “लुटला” त्याची आकडेवारी सादर करून फुटिरांना उघडे पाडले. मग कारण द्यायचे काय, यावर बऱ्याच “चिंतन बैठका” झाल्या. काही जण रात्रीच्या अंधारात गुपचूप एकटे भेटून कूजन करू लागले. त्यातून ही “संघ” म्हणून “एक समान कार्यक्रम” स्क्रिप्ट ठरली. सर्वांनी एका सुरात बोलायचे. “एक साथ एक सूर मे बोलेंगे बोल!” त्यानुसार आता हे सगळे दोन आठवडे कैद असलेले बोलके पोपट बोलत सुटले आहेत.

तुम्ही का गोंधळालाय ते माहिती आहे, तुमची मानसिक अस्वस्था माहिती आहे.

संदीपान भुमरे यांनी मंत्री झाल्यावर सामना कार्यालयात येऊन माझ्या समोर लोटांगण घालून “तुमच्यामुळे सत्ता आली, तुमच्यामुळे मंत्री झालो, अशी कृतज्ञ भावना व्यक्त केली होती.

फुटीरांची भाषा कशी-कशी
बदलत गेली ते पाहा …

पळून गेल्यानंतर पहिला दिवस
– आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो.

दुसरा दिवस – राष्ट्रवादीचे लोक आम्हाला निधी देत नव्हते.

तिसरा दिवस – आम्हाला उद्धव ठाकरे भेटीला वेळ देत नव्हते.

चौथा दिवस – आदित्य ठाकरे जास्त ढवळाढवळ करत होते.

पाचवा दिवस – विठ्ठलाभोवती बडवे जास्त झाले होते.

सहावा दिवस – संजय राऊत जास्त बोलायचे.

सातवा दिवस – आता आम्ही घरी पोहचलोय, बघतो एकेकाला, मी वाघ हाय.. मी बैल नाय.. मी रेडा नाय … मी ह्याव हाय.. मी त्यांव हाय.

तुम्ही नेमके का गेलात, ते एकदाचे ठरवा, गोंधळू नका! – संजय राऊत

• “तुम्ही का गोंधळालाय ते माहिती आहे, तुमची मानसिक अस्वस्था अशी का आहे, ते माहिती आहे.

• संदीपान भुमरे यांनी मंत्री झाल्यावर सामना कार्यालयात येऊन माझ्यासमोर लोटांगण घालून “तुमच्यामुळे सत्ता आली, तुमच्यामुळे मंत्री झालो,” अशी कृतज्ञ भावना व्यक्त केली होती.

• संजय राठोड यांना कठीण काळात “भानगडीतून” कुणी वाचवले?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!