आमदार कुणाल पाटील यांच्याकडून रुग्णालयात धाव घेत विचारपूस
धुळे (ब्रेकिंग महाराष्ट्र) : लग्नासाठी जाणाऱ्या वऱ्हाडी वाहनाला अपघात झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अपघातात दाेघेजण गंभीर जखमी झाले असून, 20 जखमींवर धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
मुंबई आग्रा महामार्ग राष्ट्रीय क्रमांक 3 तिसगाव ढंढाणे फाट्याजवळ 7 जुलै गुरुवारी वडेल गावाहून लग्नाचे वऱ्हाड नेणाऱ्या आयशर ट्रक क्रं एम एच 18 बी जी 9804 ने वडेल गावातील मंडळी कांचनपूर येथे लग्नाला जात होते, याच दरम्यान धुळे तालुक्यातील तिसगाव धंडाने फाट्यावर दुपारच्या वेळी ट्रकने आयशरला कट मारताना उजव्या बाजूला अगदी खेटून नेल्याने ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर तर 20 जण जखमी झाले आहे. आयशरच्या टप्प्यावर बसलेल्या तरुणांच्या पायाला जबर मार लागला आहे. महामार्गावर अपघातामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी टोलनाक्यावरील रुग्णवाहिकेच्या मदतीने अपघातातील जखमींना तातडीने धुळे येथील हिरे मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांना कळताच ते तातडीने रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली. यावेळी डॉक्टरांना रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी आदेशित केले. भेटी प्रसंगी जिल्हा रुग्णालयातील रुग्ण सेवा कमतरतेबाबत बऱ्याच बाबी निदर्शनास आल्या. त्या जाणून घेऊन तातडीने एक बैठक घेऊन त्याचे निराकरण केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.