सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – मनोरमा को ऑप. बँकेची पंचवार्षिक निवडणूक (सन २०२२- २०२३ ते २०२७ -२८) रविवारी घेण्यात आली. त्यामध्ये चेअरमनपदी श्रीकांत मोरे यांची निवड करण्यात आली. त्यांना सूचक म्हणून दत्तात्रय मुळे आणि अनुमोदक म्हणून प्रशांत शहापूरकर होते. तर व्हाईस चेअरमनपदी संतोष सुरवसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुरवसे यांना सूचक म्हणून गजेंद्र साळुंके तर अनुमोदक म्हणून सुहास भोसले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. बी. माने यांनी काम पाहिले.
निवडीसंबंधीची सभा विजापूर रोडवरील कोटणीस नगर येथील मनोरमा कॉन्फरन्स हॉलमध्ये घेण्यात आली. यामध्ये चेअरमनपदी मोरे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला असल्यामुळे त्यांची चेअरमनपदी निवड जाहीर करण्यात आली. तर व्हा. चेअरमनपदी सुरवसे यांची निवड एकमताने करण्यात आली. यावेळी चेअरमन मोरे, व्हा. चेअरमन सुरवसे यांच्यासह नवनिर्वाचित संचालक म्हणून डॉ. सुमित मोरे, डॉ. ऋचा पाटील, गणपत कदम, सुहास भोसले, गजेंद्र साळुंके, डॉ. सत्यजित वाघचवरे, दत्तात्रय मुळे, मैनुद्दिन नदाफ, बब्रुवाहन रोंगे, अस्मिता गायकवाड, शुभांगी भोसले, चंद्रकांत खरटमल, प्रशांत शहापूरकर, विकास सक्री, संतोष मोटे यांच्या अविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. बी. माने यांनी केली. कर्मचारी प्रतिनिधी म्हणून असि. मॅनेजर नीलकंठ करंडे, असि. मॅनेजर कमलाकर पुजारी यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित सर्व संचालकांचा यावेळी चेअरमन मोरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा शोभा मोरे, डॉ. आदित्य पाटील, धनश्री मल्टिस्टेटचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे, तुळजापूरचे असि. रजिस्ट्रार दत्तात्रय मोरे, नगरसेवक अमोल (बापू) शिंदे, डॉ. राजशेखर शिंदे, प्रा. कल्याण शिंदे, विशेष लेखा परीक्षक डोके, बँकेच्या सीईओ शिल्पा कुलकर्णी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शाखाधिकारी अजय मोरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. माऊली जाधव यांनी आभार मानले.